43 कोटींच्या बंगल्यात फुकटात लग्न उरकण्याचा प्लॅन, पोलिसांकडून जोडप्याची ‘वरात’

रिकाम्या बंगल्यात कोणीच राहत नाही, असा विचार करुन जोडप्याने लग्नासाठी आपल्या पाहुण्यांना निमंत्रण दिले. (Bride Groom Mansion Miami Wedding)

43 कोटींच्या बंगल्यात फुकटात लग्न उरकण्याचा प्लॅन, पोलिसांकडून जोडप्याची 'वरात'
मियामी येथील आलिशान मॅन्शन
Follow us
| Updated on: Apr 23, 2021 | 11:35 AM

फ्लोरिडा : बंगला विकत घेण्यास उत्सुक असल्याचं दाखवून तिथे फुकटात लग्न उरकू पाहणाऱ्या दाम्पत्याला पोलिसांनी हिसका दाखवला. अमेरिकेतील मियामी (Miami) शहरामधील 5.7 मिलियन डॉलर (अंदाजे 43 कोटी रुपये) किमतीचे मॅन्शन विकत घेण्यास उत्सुक असल्याचं भासवून  दक्षिण फ्लोरिडातील एका दाम्पत्याने चक्क लग्न मंडपही मांडला. मात्र मूळ मालकाला हा प्रकार लक्षात आल्याने त्याने पोलिसांच्या मदतीने वऱ्हाडींची ‘वरात’ काढली. (Florida Bride Groom Gate Crashes Mansion in Miami US for Wedding)

43 कोटींचा आलिशान मॅन्शन

कर्टनी विल्सन (Courtney Wilson) आणि शेनिता जोन्स (Shenita Jones) हे फ्लोरिडात राहणारे दाम्पत्य. त्यांनी स्वतःची रॉयल कपल अशी ओळख मिरवत मियामीमधील ड्रीम होम इस्टेटमध्ये मित्र आणि नातेवाईकांना लग्नासाठी बोलावलं. या आलिशान मॅन्शनमध्ये नऊ बेडरुम आणि 15 बाथरुम असलेला बंगला, टेनिस कोर्ट, स्वीमिंग पूल आणि थिएटर अशी व्यवस्था आहे.

बंगला रिकामा असल्याचा समज

मालकाने विकायला काढलेल्या संबंधित मॅन्शनची जाहिरात नवरदेव विल्सन याने पाहिली होती. हा बंगला विकत घेण्यास आपण उत्सुक असल्याचे भासवत त्याने प्रॉपर्टीला अनेक वेळा भेटी दिल्या. यावेळी परिसराचे चिक्कार फोटोही त्याने काढले. रिकाम्या बंगल्यात कोणीच राहत नाही, असा विचार करुन त्याने लग्न आणि संबंधित विधींसाठी आपल्या पाहुण्यांना निमंत्रण दिले.

गेल्या शनिवारी दुपारी रेड कार्पेट कॉकटेल आणि रविवार सकाळी ब्रेकफास्टचंही आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या मॅन्शनमधील दुसऱ्या बंगल्यात राहणारा मूळ मालक नॅथन फिंकल (Nathan Finkel) अनाहूत पाहुण्यांना पाहून चक्रावला. पोलिसांना फोन करुन त्याने आपल्या प्रॉपर्टीवर अतिक्रमण झाल्याची तक्रार केली.

अटक न करता पोलिसांनी हुसकावलं

‘हा देवाचा संदेश आहे, की आमचे लग्न इथे व्हावे’ असं म्हणत जोडपं आपल्याला त्रास देत असल्याचा दावाही मालकाने केला. पोलिसांनी घटनास्थळी, म्हणजे लग्नस्थळी धाव घेतली. कोणालाही अटक न करत त्यांनी हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. अखेर थाटामाटात आलिशान लग्न सोहळा करण्याचं स्वप्न गुंडाळून जोडप्यासह वऱ्हाड्यांची वरात आपापल्या घरी गेली.

संबंधित बातम्या :

जुळलेल्या लग्नात नवरदेवाकडूनच विरजण, आधी नवरीवर बंधनं घातली, नंतर सासरच्या मंडळींवर गोळीबार

लग्नाच्या पाच महिन्यानंतरही ‘सुहागरात’ला नकार, पत्नीबाबत जे समोर आलं, त्याने नवरदेव हादरला!

(Florida Bride Groom Gate Crashes Mansion in Miami US for Wedding)

Non Stop LIVE Update
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.