घाडगे, जालान, खान ते राऊत; परमबीर सिंग यांच्यावर कोणकोणते आरोप? चौकशा किती? वाचा सविस्तर

पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे, बुकी सोनू जालान यांच्यापासून व्यावसायिक मुनिर खान, मयुरेश राऊत यांनी परमवीर सिंग यांच्याविरोधात तक्रारी केल्या असून त्यांच्या तीन चौकशा सुरु आहेत. (Param Bir Singh accusations enquiries )

घाडगे, जालान, खान ते राऊत; परमबीर सिंग यांच्यावर कोणकोणते आरोप? चौकशा किती? वाचा सविस्तर
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सोमवारी हजर राहण्याचे चांदिवाल आयोगाचे आदेश
Follow us
| Updated on: May 23, 2021 | 7:35 AM

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमवीर सिंग (Param Bir Singh) यांच्या विरोधात एक गुन्हा दाखल असून अनेक चौकशा सुरु आहेत. परमवीर सिंग यांनी आतापर्यंत तीन याचिका वेगवेगळ्या न्यायालयात दाखल केल्या आहेत. एखाद्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी किंवा पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यावर एवढ्या चौकश्या सुरु असण्याची ही पहिलीच घटना असावी. यापूर्वी अनेक अधिकाऱ्यांच्या चौकश्या झाल्या आहेत. मात्र परमबीर सिग यांच्यावरील चौकशांचा आकडा मोठा आहे. (Former Mumbai CP Param Bir Singh accusations and enquiries here is the full detailed report)

पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे प्रकरण

पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांच्या तक्रारीवरुन परमबीर सिंग यांच्याविरोधात एक गुन्हा दाखल आहे. तर तीन चौकश्या सुरु आहेत. परमवीर सिंग हे ठाणे येथे पोलिस आयुक्त असताना त्यांनी पोलीस निरीक्षक घाडगे यांच्याविरोधात पाच गुन्हे दाखल केले होते. यातील एका गुन्ह्यात घाडगे यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्याच मुद्द्याचा आधार घेत घाडगे यांनी परमवीर सिंग यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी प्रिव्हेन्शन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

त्याचप्रमाणे घाडगे यांच्या विरोधात जे चार गुन्हे दाखल झाले होते, त्याबाबतची तक्रार त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे केली होती. त्यानंतर पोलीस महासंचालकांनी या तक्रारीची दखल घेऊन गुन्ह्यांचा तपास स्टेट सीआयडीकडे सोपवला आहे. तर परमबीर सिंग यांच्या मालमत्तेबाबत पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. पोलीस निरीक्षक घाडगे यांच्या तक्रारीनुसार परमवीर सिंग यांच्याविरोधात एक गुन्हा दाखल झाला आहे, तर तीन चौकशा सुरु आहेत.

1) अॅट्रोसिटी प्रिव्हेन्शन अॅक्टनुसार गुन्हा दाखल 2) अॅट्रोसिटी प्रकरणाचा तपास स्टेट सीआयडीकडे – चौकशी सुरू 3) घाडगे यांच्याविरोधात दाखल चार गुन्ह्यांचा तपास स्टेट सीआयडीकडे – चौकशी सुरू 4) घाडगे यांची परमबीर सिंग यांच्या संपत्तीबाबत एसीबीकडे तक्रार – चौकशी सुरू

सोनू जालान प्रकरण

सोनू जालान हा बुकी आहे. 2017 मध्ये सोनू जालानवर दोन गुन्हे नोंदवण्यात आले होते. एक गुन्हा क्रिकेट बेटिंगचा होता. तर दुसरा गुन्हा अपहरणाचा होता. या गुन्ह्यात सोनू जालनला अटक करण्यात आली होती. मोक्का कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. सोनू जालान 14 महिने तुरुंगात होता. यानंतर त्याने परमवीर सिंग यांच्याविरोधात राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे तक्रारी केल्या असून त्याच्याही चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्टेट सीआयडी परमवीर सिंग यांची चौकशी करत आहे. तर सोनू जालानने केलेल्या तक्रारीनुसार राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागही चौकशी करत आहे.

मयुरेश राऊत प्रकरण

मयुरेश राऊत हे बिल्डर आहेत. वसई-विरार या परिसरात त्यांचा व्यवसाय आहे. मयुरेश यांनी देखील परमवीर सिंग यांच्याविरोधात अनेक ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारीची दखल घेऊन सध्या परमबीर सिग यांच्या विरोधात स्टेट सीआयडी चौकशी करत आहे. त्याचप्रमाणे मयुरेश यांनी दुसरी तक्रार परमवीर सिंग आणि इतर अधिकाऱ्यांच्या मालमत्तेच्या विरोधात केली असल्याने त्याबाबत अँटी करप्शन ब्युरो चौकशी करत आहे.

मुनीर खान प्रकरण

मुनीर खान हे मध्य प्रदेशातील व्यापारी आहेत. ते भोपाळ येथे राहतात. पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या एका खबरीसोबत मुनीर खान यांचं भांडण झालं होतं. यानंतर मुनीर खान यांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. एवढेच नव्हे तर त्यांच्याकडे काही कोटी रुपये रक्कम देखील मागण्यात आली होती. मुनीर खान यांना मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीही करण्यात आलं होतं. मात्र मुनिर खान यांच्या विरोधात जो अपहरणाचा गुन्हा होता, त्या तक्रारदाराचं ज्या दिवशी अपहरण झालं होतं. त्या दिवशी मुनीर खान हे दुबई येथे होते. यामुळे मुनीर खान यांना कोर्टाने तात्काळ अटकपूर्व जामीन दिला. यानंतर आता मुनीर खान यांनी परमवीर सिंग यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे. या तक्रारीची चौकशी स्टेट सीआयडी करत आहे.

जिलेटिन कार प्रकरण

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ 24 फेब्रुवारी रोजी जिलेटीन स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. याबाबत सुरुवातीला मुंबई क्राईम ब्रांचने गुन्हा दाखल केला होता .यानंतर या गुन्ह्याचा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणामध्ये एनआयएने परमवीर सिंग यांना देखील चौकशीसाठी बोलावलं होतं.

मुंबई क्राईम ब्रांचकडून चौकशी

परमवीर सिंग यांची सर्वात पहिली चौकशी मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकार्‍यांनी केली होती. परमबीर सिंग यांनी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलिस निरीक्षक सचिन वाझेला शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले, असा आरोप केला होता. याची चौकशी संबंधित अधिकाऱ्यांनी केली.

न्यायमूर्ती चांदिवाल आयोग चौकशी

परमवीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिलं होतं. या प्रकरणाची दखल घेऊन उद्धव ठाकरे यांनी एका न्यायालयीन आयोगाची स्थापना केली आहे. या आयोगाचे प्रमुख माजी न्यायमूर्ती चंदिवाल हे आहेत. परमबीर सिग यांच्या तक्रारीनुसार न्यायमूर्ती चांदिवाल आयोग चौकशी करणार आहे. (Param Bir Singh accusations enquiries )

पोलीस महासंचालक चौकशी प्रकरण

परमवीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेला आरोप सरकारी अधिकार्‍यांच्या सेवा शर्तीचा भंग असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी देखील सुरु आहे. सुरुवातीला परमबीर सिंग आयपीएस अधिकारी असल्याने त्यांची चौकशी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे हे करत होते. मात्र, संजय पांडे यांनी चौकशीसाठी परमबीर यांना बोलावलं असता, त्यांनी पांडे याचंच स्टिंग ऑपरेशन केलं. त्यामुळे संजय पांडे हे संतापले. त्यांनी आपण परमवीर सिंग यांची चौकशी करणार नाही, असं सांगितलं. त्यामुळे आता परमवीर सिंग यांची चौकशी प्रधान सचिव देबाशिष चक्रवर्ती हे करत आहेत.

सदा पावले एन्काऊंटर प्रकरण

परमवीर सिंग हे सध्या पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी आहेत. ते सध्या होमगार्ड विभागाचे पोलीस महासंचालक आहेत, मात्र ते पोलिस उपायुक्त असल्यापासून अनेक प्रकरणात त्यांचं नाव आलं आहे. परमवीर सिंग हे पोलिस उपायुक्त असताना गँगस्टर सदा पावले एन्काऊंटर झालं होतं. हे एनकाउंटर बनावट असल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी तेव्हाचे सेशन कोर्टाचे प्रधान न्यायमूर्ती अग्यार यांच्या कोर्टात झाली होती. सदा पावलेचं एन्काऊंटर परमवीर सिंग यांच्या हाताखाली काम करणाऱ्या त्यांच्या पथकातील अधिकाऱ्यांनी केलं होतं

सलील चतुर्वेदी ड्रग्स प्रकरण

परमबीर सिंग हे वेस्ट विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त असताना सलील चतुर्वेदी यांचं प्रकरण घडलं होतं. या प्रकरणात काही पोलिस अधिकाऱ्यांना अटक झाली होती. याच प्रकरणात परमवीर सिंग यांची देखील चौकशी झाली होती.

संबंधित बातम्या :

बुकी सोनू जालान ते पीआय डांगे, परमबीर सिंग यांच्यावरील तीन आरोपांची गोपनीय चौकशी

दुबईत असतानाही भारतातील अपहरणाच्या गुन्ह्यात अडकवले, व्यापाऱ्याची परमबीर सिंग-प्रदीप शर्मांविरोधात तक्रार

(Former Mumbai CP Param Bir Singh accusations and enquiries here is the full detailed report)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.