AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये फळ विक्रेत्यांवर टोळक्याकडून सशस्त्र हल्ला, कारण अनभिज्ञ

पुण्यानंतर नाशिकमध्ये टोळक्याची दहशत सुरु आहे. दहशत पसरवण्याच्या हेतूने टोळक्याकडून हल्ल्याची घटना घडली आहे.

नाशिकमध्ये फळ विक्रेत्यांवर टोळक्याकडून सशस्त्र हल्ला, कारण अनभिज्ञ
अज्ञात कारणातून टोळक्याचा फळ विक्रेत्यांवर हल्लाImage Credit source: TV9
| Updated on: Jun 15, 2023 | 5:37 PM
Share

चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, नाशिक : दोन फळ विक्रेत्यांवर एका टोळक्याकडून सशस्त्र हल्ला झाल्याची घटना नाशिकच्या सातपूर परिसरात घडली. या हल्ल्याचे नक्की कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र दहशत पसवरण्याच्या हेतूने टोळक्याने हे केल्याचे कळते. या हल्ल्यात फळ विक्रेते बंधू अखिलकुमार साहू आणि संतोषकुमार साहू हे गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांनाही उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. याप्रकरणी सातपूर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात नेले. आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

नागरिकांना पाहून हल्लेखोर फरार

जखमी अखिलकुमार साहू याने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री दुकान बंद करण्याच्या वेळेला अचानक एका टोळक्याने जवळ येत त्याच्या आणि भावाच्या डोक्यावर आणि तोंडावर अचानक शस्त्राने वार केले. तसेच फळाची गाडी पलटी करून साहित्याचे देखील नुकसान केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे घाबरून गेलेल्या साहू बंधूंनी आरडाओरड केली. त्यांचा आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक धावत आले. नागरिक जमा झाल्याचे पाहून हल्लेखोर पळून गेले. या घटनेनंतर मात्र परिसरात दहशत निर्माण झाली होती. याबाबत सातपूर पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

ठाण्यात दोन गटांत तुंबळ हाणामारी

ठाण्यातील कापूरबावडी ढोकाली परिसरात दोन गटात राडा झाला. पत्ता सांगत नाही म्हणून चक्क कोयता, चाकू आणि हत्यारं घेऊन दुकानदाराला बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी ठाणे कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Follow Us
युद्धाचा मोठा फटका; LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या रांगा
युद्धाचा मोठा फटका; LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या रांगा.
गडचिरोली : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दणका, पिकांचे मोठे नुकसान
गडचिरोली : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दणका, पिकांचे मोठे नुकसान.
धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप; मोठे नेते मला संपवण्याच्या प्रयत्नात होते
धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप; मोठे नेते मला संपवण्याच्या प्रयत्नात होते.
चाकणकर यांचा राजीनामा घ्या, संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
चाकणकर यांचा राजीनामा घ्या, संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
भोंदूबाबा अशोक खरात यांच्या मालमत्तेवर पोलिसांचा छापा
भोंदूबाबा अशोक खरात यांच्या मालमत्तेवर पोलिसांचा छापा.
खरात यांना नाशिक पोलिसांकडून अटक; समर्थकांकडून पत्रकारांना दमदाटी
खरात यांना नाशिक पोलिसांकडून अटक; समर्थकांकडून पत्रकारांना दमदाटी.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल.
मुंबईतील गिरगावात शोभायात्रेचा उत्साह, तरूणाईचा उत्साह शिगेला
मुंबईतील गिरगावात शोभायात्रेचा उत्साह, तरूणाईचा उत्साह शिगेला.
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन.
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला.