पॉर्न रॅकेटमध्ये हिरोईन, समजून घ्या रॅकेटचे सर्व धागेदोरे, कोण हिरोईन, कोण दलाल?

मूळचा गोव्याचा असलेला यापूर्वी उमेश हा देशातील खुप मोठ्या उद्योगपतीचा PA होता. | gehana vasisth Porn racket

पॉर्न रॅकेटमध्ये हिरोईन, समजून घ्या रॅकेटचे सर्व धागेदोरे, कोण हिरोईन, कोण दलाल?

मुंबई: पॉर्न फिल्म प्रकरणात मुंबई पोलिसांनी अभिनेत्री गहना वशिष्ठाला (gehana vasisth) अटक केल्यानंतर आता याप्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. या पॉर्न रॅकेटचे धागेदोरे बॉलीवूड आणि परदेशातही पसरलेले आहेत. त्यामुळे मुंबई क्राइम ब्रँचच्या (Mumbai Crime Branch) प्रॉपर्टी सेलकडून याप्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे. (Porn racket: Model lured newbies, paid Rs 20,000 per film)

मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने मुंबईत शूट केलेले पोर्नोग्राफिक व्हिडिओ परदेशातून केव्हा आणि कसे अपलोड करावे यासाठी समन्वय साधणार्‍या म्हणजे मध्यस्थाला अटक केली आहे. उमेश कामत अस अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. एकदा अश्लील चित्रपटाचे चित्रीकरण झाल्यानंतर अभिनेत्री गहना वशिष्ठ तो व्हीडिओ व्ही .ट्रान्सफरवर अपलोड करायची आणि परदेशात बसलेल्या अपलोडर आणि उमेशला लिंक पाठवायची. त्यानंतर उमेश हा व्हिडिओ केव्हा आणि कसा अपलोड करायचा यावर समन्वयक म्हणून काम करायचा.

कोण आहे उमेश कामत ?

मूळचा गोव्याचा असलेला यापूर्वी उमेश हा देशातील खुप मोठ्या उद्योगपतीचा PA होता. पण काही कारणास्तव त्याची ती नोकरी गेली आणि उमेश या पॉर्नच्या धंद्यात शिरला… परदेशी अ‍ॅपला पॉर्न फिल्म विकून उमेश आणि गहना कोट्यवधी रुपये कमवत होते. HotMovies नावाची वेबसाईट तयार करुन त्या वेबासाईटवर या पॉर्न फिल्म विकल्या जात होत्या. तर उमेश त्याचे परदेशातील सोर्स वापरुन याच पॉर्न फिल्म जगभर विकत होता. अटक केल्यानंतर उमेशला आज न्यायालयात हजर केले असता त्याला 10 फेब्रुवारी 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

पैशांचे आमिष दाखवून तसच वेब सिरीज मध्ये काम मिळवून देतो या बहाणे तब्बल 15 मुलींची ब्लू फिल्म बनवणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांच्या मालमत्ता कक्षाने पर्दाफाश केल्यानंतर आता या प्रकरणात अनेक मोठे खुलासे होवू लागले आहेत. स्वत:च्या प्रॉडक्शन हाऊसचा वापर करुन जबरदस्तीने पॉर्न फिल्म बनवल्याच्या आरोपा खाली अभिनेत्री गहना वशिष्ठला दोन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी अटक केली होती.

काय आहे वी. ट्रान्सफर?

WeTransfer जगभरात वीडियो फ़ाइल पाठवण्याचा सर्वात सोपा माध्यम आहे. ज्याच्या माध्यमातून कोणीही 2GB पर्यंतची फाईल फ्री मध्ये शेयर करू शकतो. WeTransfer वर शेअर केलेली फाईल सात दिवसांनी आपोआप डिलीट होते.

लॉकडाऊनमध्येही रॅकेट सुरु

लॉकडाऊनच्या काळातही या पॉर्न रॅकेटचे काम जोरात सुरु होते. याच काळात अनेक अश्लिल चित्रपटांची शुटिंग करण्यात आल्याची माहिती आहे. या रॅकेटच्या माध्यमातून एस्कॉर्ट सर्व्हिस किंवा वेश्या व्यवसायही केला जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. यापैकी काही मॉडेल्स आणि अन्य लोकांचा बॉलीवूडशी संबंध असल्याचेही समजते.

संबंधित बातम्या:

पॉर्न फिल्म प्रकरणात अभिनेत्रीच्या अटकेनंतर नवा खुलासा; बड्या उद्योजकाच्या माजी पीएला अटक

पॉर्न फिल्मच्या वादामुळे सोशल मीडियावर गहना वशिष्ठची जोरदार चर्चा; नेटकरी म्हणतात…

(Porn racket: Model lured newbies, paid Rs 20,000 per film)

Published On - 6:54 pm, Mon, 8 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI