पॉर्न फिल्म प्रकरणात अभिनेत्रीच्या अटकेनंतर नवा खुलासा; बड्या उद्योजकाच्या माजी पीएला अटक

उमेश कामत हा पॉर्न व्हिडीओ परदेशातून केव्हा आणि कसे अपलोड करायचे, हे कामकाज पाहायचा. | Porn Film

पॉर्न फिल्म प्रकरणात अभिनेत्रीच्या अटकेनंतर नवा खुलासा; बड्या उद्योजकाच्या माजी पीएला अटक
गहना वशिष्ठ ही शुटिंग झाल्यानंतर तो व्हिडीओ व्ही ट्रान्सफरवर अपलोड करायची. या व्हिडीओची एक लिंक ती अपलोडरला आणि एक लिंक उमेश कामतला पाठवायची.

मुंबई: पॉर्न फिल्म प्रकरणात मुंबई पोलिसांनी अभिनेत्री गहना वशिष्ठाला (gehana vasisth) अटक केल्यानंतर आता याप्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. या माहितीच्याआधारे पोलिसांनी उमेश कामत या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. उमेश कामत याने यापूर्वी एका बड्या उद्योजकाचा खासगी मदतनीस (PA) म्हणून काम केले आहे. त्यामुळे आता याप्रकरणात काही बडी नावे समोर येण्याची शक्यता आहे. (Porn film case Mumbai police arrested one more person)

उमेश कामत हा पॉर्न व्हिडीओ परदेशातून केव्हा आणि कसे अपलोड करायचे, हे कामकाज पाहायचा. गहना वशिष्ठ ही शुटिंग झाल्यानंतर तो व्हिडीओ व्ही ट्रान्सफरवर अपलोड करायची. या व्हिडीओची एक लिंक ती अपलोडरला आणि एक लिंक उमेश कामतला पाठवायची. हा व्हिडीओ केव्हा आणि कसा अपलोड करायचा, यासंबंधीचे सर्व निर्णय उमेश घेत होता. पोलिसांनी उमेशला अटक केल्यामुळे आता याप्रकरणातील आणखी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. उमेशला सोमवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

‘गंदी बात’ फेम अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक

टीव्ही अभिनेत्री गहना वशिष्ठाला मुंबई क्राइम ब्रँचच्या (Mumbai Crime Branch) प्रॉपर्टी सेलने रविवारी अटक केली होती. एक अडल्ट व्हीडिओ शूटिंग शेअर केल्याप्रकरणी तिला ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.

मिस आशिया बिकिनीचा ताज जिंकणाऱ्या गहना हिने हिंदी, तेलगू सिनेमांमध्ये आणि अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. या प्रकरणात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गहनाने 87 अश्लील व्हीडिओ आणि पॉर्न व्हीडिओ शूट केले आहेत आणि ते तिच्या वेबसाईटवर अपलोड केले आहेत. या चॅनेलची सदस्यता घेतलेल्या लोकांना 2 हजार रुपये हे व्हीडिओ पाहण्यासाठी द्यावे लागतात.

पोलिसांनी या सगळ्याची खबर कशी मिळाली?

सिनेमा शूटिंगच्या नावाखाली मड बेटावर काही खासगी बंगल्यांमध्ये वेश्या व्यवसाय आणि शॉर्ट पॉर्न व्हीडिओ शूट होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर मोठी हुशारीने पोलिसांनी या बंगल्यांवर छापे टाकले. काही टोळ्या तरुण मुलींना सिनेमात मोठं काम देतो असं सांगून अश्लील व्हिडिओंमध्ये काम करून घेत होत्या. या रॅकेटमधून पोलिसांनी दोन मुलींची सुटका केली ज्यांना नशामुक्ती केंद्रामध्ये पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, या छाप्यात पोलिसांनी यासमीन बेग खान, प्रतिभा नलावडे, मोनू गोपालदास जोशी, भानुसूर्यम ठाकूर आणि मोहम्मद आसिफ यांना अटक केली होती.

(Porn film case Mumbai police arrested one more person)

Published On - 2:16 pm, Mon, 8 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI