पॉर्न फिल्मच्या वादामुळे सोशल मीडियावर गहना वशिष्ठची जोरदार चर्चा; नेटकरी म्हणतात…

गहनाने 87 अश्लील व्हीडिओ आणि पॉर्न व्हीडिओ शूट केले आहेत आणि ते तिच्या वेबसाईटवर अपलोड केले आहेत. | Gehana vasisth

पॉर्न फिल्मच्या वादामुळे सोशल मीडियावर गहना वशिष्ठची जोरदार चर्चा; नेटकरी म्हणतात...

मुंबई: पॉर्न फिल्म प्रकरणात मुंबई पोलिसांनी अभिनेत्री गहना वशिष्ठाला (gehana vasisth) अटक केल्यानंतर सध्या सोशल मीडियावर तिच्या नावाची चांगलीच चर्चा सुरु आहे. मिस आशिया बिकिनीचा ताज जिंकणाऱ्या गहना हिने हिंदी, तेलगु सिनेमांमध्ये आणि अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. या प्रकरणात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गहनाने 87 अश्लील व्हीडिओ आणि पॉर्न व्हीडिओ शूट केले आहेत आणि ते तिच्या वेबसाईटवर अपलोड केले आहेत. या चॅनेलची सदस्यता घेतलेल्या लोकांना 2 हजार रुपये हे व्हीडिओ पाहण्यासाठी द्यावे लागतात.

कोण आहे गहना वशिष्ठ?

‘गंदी बात’ या वेब सिरीजमुळे गहना वशिष्ठ प्रकाशझोतात आली होती. गहनाने आतापर्यंत आपली खरी ओळख लपवून ठेवली होती. तिचे खरे नाव वंदना तिवारी असे आहे. वंदना ही मूळची छत्तीसगढची असून तिचे वडील शिक्षण विभागात अधिकारी आहेत.

‘गंदी बात’ या वेब सिरीजमुळे ती अल्पावधीत लोकप्रिय झाली होती. त्यामुळे गहनाच्या अटकेने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तेव्हापासून इंटरनेटवर गहना वशिष्ठ या नावाने सर्चिंग होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच ट्विटवर अनेकजण गहना वशिष्ठ आणि पॉर्न फिल्म प्रकरणावर आपापली मते मांडत आहेत.

पॉर्न फिल्म प्रकरणात अभिनेत्रीच्या अटकेनंतर नवा खुलासा; बड्या उद्योजकाच्या माजी पीएला अटक

पॉर्न फिल्म प्रकरणात मुंबई पोलिसांनी अभिनेत्री गहना वशिष्ठाला (gehana vasisth) अटक केल्यानंतर आता याप्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. या माहितीच्याआधारे पोलिसांनी उमेश कामत या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. उमेश कामत याने यापूर्वी एका बड्या उद्योजकाचा खासगी मदतनीस (PA) म्हणून काम केले आहे. त्यामुळे आता याप्रकरणात काही बडी नावे समोर येण्याची शक्यता आहे.

उमेश कामत हा पॉर्न व्हिडीओ परदेशातून केव्हा आणि कसे अपलोड करायचे, हे कामकाज पाहायचा. गहना वशिष्ठ ही शुटिंग झाल्यानंतर तो व्हिडीओ व्ही ट्रान्सफरवर अपलोड करायची. या व्हिडीओची एक लिंक ती अपलोडरला आणि एक लिंक उमेश कामतला पाठवायची. हा व्हिडीओ केव्हा आणि कसा अपलोड करायचा, यासंबंधीचे सर्व निर्णय उमेश घेत होता. पोलिसांनी उमेशला अटक केल्यामुळे आता याप्रकरणातील आणखी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. उमेशला सोमवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI