बकऱ्या चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात, 3 लाख 89 हजार 500 रुपयांचा माल हस्तगत

महाराष्ट्रात बकऱ्या चोरी होणाऱ्याचं प्रमाण अधिक वाढलं आहे. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर 3 लाख 89 हजार 500 रुपयांच्या बकऱ्या ताब्यात घेतल्या आहेत. त्याचबरोबर चार जणांना अटक केली आहे.

बकऱ्या चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात, 3 लाख 89 हजार 500 रुपयांचा माल हस्तगत
Crime news in marathiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 05, 2023 | 7:56 AM

शाहिद पठाण, गोंदिया : गोंदिया-भंडारा (gondia bhandara) जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून चोरीचं प्रमाण अधिक वाढलं आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या बकरी चोरणारी टोळी अधिक सक्रीय झाली आहे. विशेष म्हणजे ही टोळी आंतरराज्यातील असल्याची माहिती पोलिसांनी (maharashtra police) दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील चार जणांना ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडून 3 लाख 89 हजार 500 रुपयांच्या बकऱ्या ताब्यात घेतल्या आहेत. अजून दोन जणांचा शोध पोलिस घेत आहेत. ते ताब्यात आल्यानंतर त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड येण्याची शक्यता पोलिसांनी (crime news in marathi) व्यक्त केली आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 39 हजार 500 रूपये रोख, चारचाकी गाडी क्रमांक सी.जी. 07, बी.झेड. 5242 किंमत 3 लाख 50 रूपये असा एकूण 3 लाख 89 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

आठवड्यात तीन मोठी प्रकरणं

गंगाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील टिकायतपूर किंडगीपार येथील एका शेतकऱ्यांच्या 22 बकऱ्या काही व्यक्तींनी 12 जुलै 2023 रोजी पहाटे 2:15 वाजता चोरून नेल्या होत्या. त्यानंतर त्या शेतकऱ्यांनी जवळचं पोलिस स्टेशन गाठलं आणि झालेला चोरीचा प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर 13 जुलै रोजी दवनिवाडा सालईटोला येथून चार बकऱ्या चोरीला गेल्या. 7 जुलै रोजी मानेगाव ठाणा येथून 12 बकऱ्या चोरट्यांनी चोरून नेल्या.

हे सुद्धा वाचा

पोलिस अधिक्षकांनी घेतला निर्णय

आठवडाभरात तीन चोऱ्या झाल्यामुळे या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली. त्याचबरोबर पोलिस अधीक्षकांनी पुढील तपास गुन्हे शाखेच्या ताब्यात दिला. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी चार जणांना ताब्यात घेतलं आहे. तसेच 3 लाख 89 हजार 500 रुपयांच्या बकऱ्या ताब्यात घेतल्या आहेत. आणखी दोन जणांचा पोलिस शोध घेत आहेत.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.