इन्स्टाग्रामवर ओळख, शिकाऊ एअर हॉस्टेसवर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा बलात्कार

चार महिन्यांपूर्वी जीत त्रिवेदीने पीडितेला त्याच्या घरी बोलावले. तिथे त्याने तिला शीतपेय आणि नाश्ता दिला. त्यानंतर, तिला चक्कर येऊ लागली आणि तिची शुद्ध हरपली. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे

इन्स्टाग्रामवर ओळख, शिकाऊ एअर हॉस्टेसवर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा बलात्कार
एअरहॉस्टेसवर बलात्कार झाल्याचा आरोप
Follow us
| Updated on: Sep 05, 2021 | 1:27 PM

गांधीनगर : 20 वर्षीय प्रशिक्षणार्थी एअर हॉस्टेसला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. दोघांची इन्स्टाग्रामवर ओळख झाल्याची माहिती आहे. गुजरातमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद शहराच्या पूर्व भागात राहणारी पीडित तरुणीची ओळख सुमारे सात महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर वेजलपूरचा रहिवासी असलेल्या जीत त्रिवेदी (20) याच्याशी झाली होती. दोघंही नियमितपणे सोशल मीडियावरुन एकमेकांच्या संपर्कात होते.

नेमकं काय घडलं?

पीडित तरुणीने पोलिसांना सांगितले की, चार महिन्यांपूर्वी जीत त्रिवेदीने तिला वेजलपूर येथील त्याच्या घरी बोलावले. तिथे त्याने तिला शीतपेय आणि नाश्ता दिला. त्यानंतर, तिला चक्कर येऊ लागली आणि तिची शुद्ध हरपली.

बलात्काराचे फोटो-व्हिडीओ काढून धमकी

ती उठल्यानंतर, जीतने तिला सांगितले की त्याने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले. तिने या घटनेबद्दल कोणाला सांगितले तर तिचे फोटो आणि व्हिडीओ पसरवण्याची धमकी दिली. जेव्हा तिने त्याला विनवणी केली तेव्हा त्याने तिला मारहाणही केल्याचा आरोप आहे.

ब्लॅकमेल करत तीन वेळा अत्याचार

आरोपी तिला सतत ब्लॅकमेल करत राहिला आणि तिच्यावर त्याने आणखी तीन वेळा जबरदस्ती केली. या घटनेचा तिच्यावर मानसिक परिणाम झाला जो तिच्या कुटुंबीयांच्या लक्षात आला. त्यानंतर पीडितेने आपबिती सांगितली आणि त्यांनी आरोपीविरोधात पोलिसात तक्रार दिली.

बीडमध्ये विवाहितेवर बलात्कार

दरम्यान, बीड जिल्ह्यात 28 वर्षीय विवाहितेवर बलात्कार झाल्याची घटना ऐन रक्षाबंधनच्या दिवशी समोर आली होती. सोशल मीडियावर फोटो अपलोड करण्याची धमकी देत नात्यातील व्यक्तीनेच महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप झाला होता. बीडच्या चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या शिंगारवाडी येथील 28 वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार झाला. गावात राहणारा नात्यातील आरोपी विक्रम काळे याने महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप झाला. महिला शेतामध्ये काम करत असताना, जवळ कोणी नसल्याची संधी साधून त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद पीडित महिलेने चकलांबा पोलिसांत दिली होती.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

दुसरीकडे, बीडमध्ये नेकनूरजवळ असलेल्या छोट्याशा गावातील 11 वर्षीय पीडितेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. मुलीचे आई-वडील बाहेरगावी गेल्यानंतर ती आपल्या मक्याच्या शेताजवळ खेळत होती. यावेळी तिथून जाणाऱ्या 24 वर्षीय नराधमाने तिला उचलून मक्याच्या शेतात अत्याचार केला. हा प्रकार लक्षात येताच शेजारच्या शेतात असणार्‍या दोन व्यक्तींनी तात्काळ पळत जात त्या तरुणाला पकडलं आणि पीडितेच्या आई-वडिलांना कळवलं.

संबंधित बातम्या :

उपराजधानी हादरली, नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

जीवे मारण्याची धमकी, जालन्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, एकाला अटक

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.