अनैतिक संबंधाच्या शंकेने पोखरलं, सूनेसोबत भाडेकरुचं अख्खं कुटंबच संपवलं, 5 जणांच्या हत्येमुळे खळबळ

आपल्या सूनेचे भाडेकरुसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून घरमालकाने सूनेसोबतच भाडेकरुचे पूर्ण कुटुंब संपवले आहे. आरोपीने धारधार शस्त्राने एकूण 5 जणांची निर्घृण हत्या केली आहे. विशेष म्हणजे हत्या करुन आरोपीने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

अनैतिक संबंधाच्या शंकेने पोखरलं, सूनेसोबत भाडेकरुचं अख्खं कुटंबच संपवलं, 5 जणांच्या हत्येमुळे खळबळ
GURUGRAM CRIME

गुरुग्राम : आपल्या सूनेचे भाडेकरुसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून घरमालकाने सूनेसोबतच भाडेकरुचे पूर्ण कुटुंब संपवले आहे. आरोपीने धारधार शस्त्राने एकूण 5 जणांची निर्घृण हत्या केली आहे. विशेष म्हणजे हत्या करुन आरोपीने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या घटनेमुळे गुरुग्राममध्ये एकच खळबळ उडाली असून आरोपी निवृत्त सैनिक असल्याचे म्हटले जात आहे. गुरुग्राम जिल्ह्यातील राजेंद्र पार्क भागात हा धक्कादायक प्रकार घडला. (Gurugram landlord killed 5 people along with his daughter in law due to extra marital affair)

नेमका प्रकार काय आहे ?

मिळालेल्या माहितीनुसार 5 जणांची हत्या झाल्याचा हा प्रकार गुरुग्राम येथील आहे. या जिल्ह्यातील राजेंद्र पार्क येथे आरोपीच्या मालकीचे घर आहे. या घरात त्याची सून, मुलगा असे कुटुंब राहत होते. तसेच त्याच्या घरात एका भाडेकरूदेखील राहत होता. मात्र, घरातील भाडेकरू आणि आपल्या सूनेचे अनैतिक संबंध अल्याचा संशय घरमालकाला आला. यानंतर रागाच्या भरात एकूण 5 जणांची त्याने हत्या केली. यामध्ये आरोपीची सून, भाडेकरू, भाडेकरूची पत्नी आणि भाडेकरुची दोन मुलं यांचा समावेश आहे. धारधार शस्त्रांनी या सर्वांची हत्या करुन आरोपी थेट पोलीस ठाण्यात दाखल झाला. तसेच आपणच या पाचही लोकांची हत्या केल्याचे त्याने कबूल केले आहे.

पोलिसांकडून तपास सुरु

या थरारक घटनेमुळे सध्या गुरुग्राम तसेच देशात खळबळ उडाली असून एकाच वेळी पाच जणांची हत्या केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाच जणांची हत्या केलेला आरोपी हा निवृत्त सैनिक आहे. पोलिसांनी मृत पाचही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर आणखी काही गोष्टी स्पष्ट होतील, असं पोलिसांनी सांगतीलं आहे.

इतर बातम्या :

भावासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय, पतीकडून पत्नीचा चाकू खूपसून खून

सावत्र बापाने पंचगंगेत बुडवलेल्या मुलीला शोधताना सापडला 50 वर्षीय बेपत्ता महिलेचा मृतदेह

नऊ वर्षीय मुलीला पंचगंगेत बुडवून ढकललं, 14 तासांनी मृतदेह सापडला, सावत्र बापाच्या कृत्याने कोल्हापूर हादरलं

(Gurugram landlord killed 5 people along with his daughter in law due to extra marital affair)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI