AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaishnavi Hagvane caese : कपडे फाडले, थप्पड लगावली… राजेंद्र हगवणेचं क्रोर्य, मयुरीच्या आरोपावर अंजली दमानिया काय म्हणाल्या?

वैष्णवी आणि मयुरी हगवणे यांच्यावर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण महाराष्ट्राला हादरवून टाकणारे आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. मयुरीने पोलीस तक्रार केली आहे. राजकीय संरक्षण आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दमानिया या महिला आयोगाशी चर्चा करणार आहेत आणि या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी करत आहेत.

Vaishnavi Hagvane caese : कपडे फाडले, थप्पड लगावली... राजेंद्र हगवणेचं क्रोर्य, मयुरीच्या आरोपावर अंजली दमानिया काय म्हणाल्या?
| Updated on: May 24, 2025 | 3:09 PM
Share

हुंड्यासाठी सुनांचा छळ करून, त्यांना मारहाण करून राबवणाऱ्या, अगदी जीव देईपर्यंत छळणार हगवणे कुटुंबियांच्या क्रूर कारनाम्यांचे एकेक अपडेट्स समोर येत असून त्याने अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. वैष्णवी हगवणे प्रमाणेच त्यांची मोठी सून मयुरी हिचाही खूप छळ झाला, मारहाण झाली. मात्र तिने ते सहन न करता पोलीस तक्रार केली आणि घरही सोडलं म्हणून ती आज जिवत तरी आहे. हे प्रकरण सर्वांनीच उचलून धरले असून दोषींना कठोरात कठोर सिक्षा होईल असे आश्वासन सरकारतर्फे वैष्णवीच्या आई-वडिलांना देण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलीस तपासातूनही नवनवे खुलासे होत असतानाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या देखील याप्रकरणाचा कसून पाठपुराव करत आहेत.

हगवणे कुटुंबियांचे अत्याचर आणि दोन्ही सुनांवर काय परिस्थिती ओढवली होती, याबाबत बोलत दमानिया यांनी प्रतिक्रियाही दिली. मयुरी जगतापने अनेक खुलासे केले होते, वैष्णवीप्रमाणेच माझाही छळ व्हायचा असा आरोप मयुरीने केला होता. आता या प्रकरणात दमानिया यांनीच लक्ष घातलं असून त्या मोठा खुलासाही करणारा आहेत.  मयुरीच्या आईने जे पत्र लिहीलं त्याबद्दलही त्या बोलल्या. हे अतिशय गंभीर प्रकरण आहे.  मयुरी ही विनाकारण आरोप करणार नाही, मयुरीच्या आईने, जे पत्र महिला आयोगाला लिहिले होते त्यात असेही लिहिले आहे, की राजेंद्र हगवणे यांनी सुद्धा मयुरीला एकदा थप्पड मारली होती. तिचे कपडे फाडले होते. आणि मयुरीच्या दिराने, शशांकनेही असं काही केलं असेल तर ते अतिशय गंभीर आहे. हगवणे हे केवळ लोभी नाही तर विकृत कुटुंब आहे अशी टीका दमानिया यांनी केली.

तसेच या कुटुंबाला राजकीय साथही होती. आणि त्यांचे मामा जालिंदर सुपेकर त्यांची पण साथ होती असे म्हणत याचा मोठा खुलासा मी थोड्यावेळात करणार आहे, याची माहिती मागवली आहे,असे दमानिया म्हणाल्या.

निलेश चव्हाण कडे जे गन लायसन्स होते तेसुद्धा जालिंदर सुपेकर ने दिले होते, अशी बातमी काही माध्यमांनी चालवली होती. निलेश चव्हाणला जालिंदर सुपेकरने जी मदत केली, ते (सुपेकर) अतिशय शौकीन आहेत. असे अधिकारी निलेश चव्हाण सारख्या माणसाला मदत करतात म्हणून वैष्णवीला प्राण गमवावे लागतात असा आरोप करत या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी दमानियांनी केली.

सोमवारी महिला आयोगाची भेट घेणार

येत्या सोमवारी मी महिला आयोगाला भेटून चर्चा करणार आहे. महिला आयोगात अनेक गोष्टीत बदल आणण्याची गरज आहे, असे दमानिया म्हणाल्या. महिला आयोगाला महिलेने तक्रार करताना ईमेल पाठवावी लागत त्यावर महिला आयोग उत्तर देतं, पण मग ग्रामीण भागातील महिला कुठून ईमेल बघणार असा सवालही त्यांनी विचारला.

हगवणे प्रकरणात जसजसे खुलासे होत चाललेत तसे खात्री पटत चालली की, यंत्रणा खूप सक्षम होणे गरजेचे आहे. आता राजकीय, पोलीस, मोठे मानस, पुरुष हे दबाव आता बंद करण्याची गरज आहे, अशी भावना अंजली दमानिया यांनी व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.