31 वर्षांपासून कारखाना मालकांकडून सामूहिक बलात्कार, विवाहितेची पोलिसात तक्रार

5 ऑगस्ट 1990 रोजी ओमप्रकाशने पहिल्यांदा आपल्यावर बलात्कार केल्याचे त्या महिलेचे म्हणणे आहे. जेव्हा महिलेने सतीश शर्मा उर्फ ​​पिंकीला संपूर्ण गोष्ट सांगितली, तेव्हा त्याने सांगितले की, याबद्दल कोणालाही सांगू नका. यानंतर त्यानेही महिलेला धमकी देऊन बलात्कार केला.

31 वर्षांपासून कारखाना मालकांकडून सामूहिक बलात्कार, विवाहितेची पोलिसात तक्रार
प्रातिनिधिक फोटो

गुरुग्राम : गुरुग्राममधील सेक्टर -37 परिसरातील एका कारखान्यात काम करणाऱ्या महिलेवर दोन मालकांनी 31 वर्षांपासून सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. महिलेचे म्हणणे आहे की अनेक वेळा तिला विरोध करायचा होता, पण आरोपी तिला आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन गप्प करायचे. आता वैतागून महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे. महिला थाना पश्चिम येथे सामूहिक बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचे म्हणणे आहे की तिचे लग्न 1990 मध्ये झाले होते. पती तिला यूपीहून गुरुग्रामला घेऊन आला. तिथे तिचा पती सेक्टर -37 मधील कारखान्यात मशीन ऑपरेटर म्हणून काम करत होता. मालकांनी त्यांना कारखाना परिसरातच राहण्यासाठी खोली दिली होती. या खोलीच्या बाजूलाच कारखान्याचे मालक ओमप्रकाश शर्मा आणि सतीश शर्मा उर्फ ​​पिंकी यांचे कार्यालय होते. त्यांनी आपले कार्यालय स्वच्छ करण्यासाठी महिलेलाही नोकरीवर ठेवले.

1990 मध्ये पहिल्यांदा बलात्कार

5 ऑगस्ट 1990 रोजी ओमप्रकाशने पहिल्यांदा आपल्यावर बलात्कार केल्याचे त्या महिलेचे म्हणणे आहे. जेव्हा महिलेने सतीश शर्मा उर्फ ​​पिंकीला संपूर्ण गोष्ट सांगितली, तेव्हा त्याने सांगितले की, याबद्दल कोणालाही सांगू नका. यानंतर त्यानेही महिलेला धमकी देऊन बलात्कार केला. त्यानंतर दोघांनी अनेकदा महिलेवर बलात्कार केला.

आरोपींची आत्महत्येची धमकी

या दरम्यान, एकदा आरोपींनी महिलेचा गर्भपातही केला. 17 नोव्हेंबर 2017 रोजी महिलेने ओमप्रकाश शर्माला सांगितले की, आता ती तिच्या कुटुंबाला सर्व काही सांगेल. ज्यावर आरोपीने सांगितले की, तसं केल्यास तो विष प्राशन करून आत्महत्या करेल आणि सुसाईड नोटमध्ये महिलेचे, तिच्या पतीचे आणि मुलाचे नाव लिहिल, ज्यामुळे तिघांनाही तुरुंगवास भोगावा लागेल. यामुळे ती महिला घाबरली.

अखेर महिलेने धीर एकवटला

27 नोव्हेंबर 2017 रोजी सतीश शर्माने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. जेव्हा महिलेने अधिक विरोध करण्यास सुरुवात केली, तेव्हा आरोपीने महिलेच्या पतीला गावात पाठवले. गावातून परतल्यावर पुन्हा तेच घडू लागले. महिलेने आपल्या पतीसोबत भाड्याने एका कॉलनीत राहायला सुरुवात केली, परंतु आरोपींचा छळ कमी होत नव्हता, म्हणून आता पोलिसात तक्रार देण्यात आली.

दोन्ही आरोपींविरोधात बुधवारी रात्री महिला ठाणा पश्चिम येथे सामूहिक बलात्कार आणि धमकी दिल्याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. महिला ठाणा पश्चिम एसएचओ निरीक्षक पूनम सिंग यांनी सांगितले की या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या :

चारचाकी वाहनात पुरुषाचा मृतदेह, पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ

अनैतिक संबंधांच्या आरोपाखाली दाम्पत्याला चाबकाचा मार, विष्ठा खायला लावली, जातपंचायत समोर नग्न उभं केलं, पीडिताच्या आत्महत्येनंतर दोघांना बेड्या

तीन तृतीयपंथी दुर्गा पूजा निमित्ताने तानसा नदीवर आंघोळीसाठी आले, पण पाण्याचा अंदाज न आल्याने अनपेक्षित दुर्घटना

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI