AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑन ड्युटी आराम करणाऱ्या डॉक्टरला कानाखाली वाजवली, तरुणीसह दोघांना अटक

संबंधित तरुणी हिस्सारमधील रुग्णालयात आपल्या नातेवाईकावर उपचार करण्यासाठी पहाटे चार वाजताच्या सुमारास पोहोचली होती. मात्र रिसेप्शन भागात बराच वेळ कुठलाही डॉक्टर दिसत नव्हता

ऑन ड्युटी आराम करणाऱ्या डॉक्टरला कानाखाली वाजवली, तरुणीसह दोघांना अटक
हरियाणात युवतीने डॉक्टरच्या कानशिलात लगावली
| Edited By: | Updated on: Jul 25, 2021 | 12:49 PM
Share

हिस्सार : नातेवाईकाच्या उपचारासाठी भल्या पहाटे हॉस्पिटलला पोहोचलेल्या युवतीला बराच वेळ डॉक्टर दिसेना. आपत्कालीन विभागाच्या शेजारच्या खोलीत तिने डोकावून पाहिलं तेव्हा एक डॉक्टर तिथे झोपलेला दिसला. युवतीने त्याचा व्हिडीओ शूट केला. यावेळी डॉक्टरने तिचा मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला असता संतप्त युवतीने त्याच्या कानशिलात लगावली. हरियाणातील हिस्सारमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

नेमकं काय घडलं?

संबंधित तरुणी हिस्सारमधील रुग्णालयात आपल्या नातेवाईकावर उपचार करण्यासाठी पहाटे चार वाजताच्या सुमारास पोहोचली होती. मात्र रिसेप्शन भागात बराच वेळ कुठलाही डॉक्टर दिसत नव्हता. तिने आपत्कालीन विभागाच्या शेजारच्या खोलीत पाहिलं, तेव्हा एक डॉक्टर आणि अन्य व्यक्ती तिथे झोपलेले दिसले. तरुणीने त्याचा व्हिडीओ चित्रित करण्यास सुरुवात केली. दुसऱ्या बेंचवर एक जण पांघरुण ओढून झोपला होता. तरुणीने डॉक्टरला जाब विचारला, तेव्हा तो ओपीडीमध्ये खुर्चीवर जाऊन बसला.

डॉक्टरच्या कानशिलात लगावली

हा व्हिडीओ हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल वीज यांना दाखवण्याची धमकी तरुणीने दिली. त्यामुळे डॉक्टरने तिच्या हातून मोबाईल खेचून घेतला. तरुणीने मोबाईल परत देण्यास सांगूनही तो ऐकत नव्हता. त्यामुळे चिडून तिने डॉक्टरच्या कानशिलात लगावली. ही घटना मोबाईलमध्ये कैद झाली आहे.

युवतीसह दोघांना अटक

दरम्यान, डॉक्टरच्या सहकाऱ्यांनी ओपीडीवर बहिष्कार घालत युवतीवर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित युवती आणि तिच्यासोबत आलेल्या युवकावर गुन्हा नोंदवून अटक केली आहे

संबंधित बातम्या :

सायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर-नर्सला मारहाण, रुग्णाच्या नातेवाईकांवर कारवाईसाठी डॉक्टरांचा कँडल मार्च

लातूरच्या रुग्णालयात 10 ते 12 जणांचा धुडगूस, डॉक्टरांना मारहाण, पोलिसांत गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

(Haryana Hisar Doctor slapped by Girl arrested video goes viral)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.