नांदेडमधील ऑनर किलिंग प्रकरणी आरोपीला फाशीच, हायकोर्टाकडून शिक्षेवर शिक्कामोर्तब

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Dec 14, 2021 | 10:10 PM

खोट्या प्रतिष्ठेसाठी ज्या हातावर राखी बांधली त्याच हाताने बहिणीचा निर्घृण खून करणाऱ्या भावाची फाशीची शिक्षा कायम ठेवण्याचा निकाल हायकोर्टाने दिला.

नांदेडमधील ऑनर किलिंग प्रकरणी आरोपीला फाशीच, हायकोर्टाकडून शिक्षेवर शिक्कामोर्तब
प्रातिनिधिक फोटो
Follow us

औरंगाबाद : आरोपी भावाने खोट्या प्रतिष्ठेसाठी ऑनर किलिंग केले. आरोपीने थंड डोक्याने नियोजनपूर्वक आणि क्रुरपणे बहिणीची आणि तिच्या प्रियकराची कोयत्याने हत्या केल्याचे नमुद करत हायकोर्टाने आरोपीची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यास नकार दिला. नांदेड जिह्यातील ऑनर किलिंगप्रकरणात हायकोर्टाने दोनही आरोपींना आज दणका दिला. (HC Confirm Death Penalty in Nanded Honour Killing case)

भोकर अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी या निर्घृण खूनप्रकरणात मयताचा सख्खा भाऊ दिंगबर बाबुराव दासरे याला फाशीची तर चुलत भाऊ मोहन नागोराव दासरे याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. ही शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही. के. जाधव आणि न्यायमूर्ती संदिपकुमार मोरे यांनी कायम केली.

प्रतिष्ठेसमोर बालपणीची मैत्री विसरला

आरोपी दिंगबर दासरे आणि मयत गोविंद विठ्ठल कराळे हे बालपणीचे मित्र आहेत. दिंगबरची बहिण पूजा हिच्याशी गोविंदचे प्रेमसंबंध होते. सर्व आरोपी हे भोकर तालुक्यातील खेरबाण येथील रहिवाशी आहेत. दरम्यान पूजाचे लग्न जेथिबा वरसेवार याच्याशी झाले. लग्नानंतर 20-22 दिवसानंतर पूजा अचानक कोणालाही न सांगता गोविंदकडे गेली. तो त्याच्या बहिणीच्या गावी खरबळा येथे असल्याने पूजाही तिथे पोहचली. पूजा हरविल्याची तक्रार तिच्या पतीने भोकर पोलिसांकडे केली. दिंगबर याला पूजा ही गोविंदकडेच गेल्याचा संशय होता. त्याने गोविंदला याबाबत विचारणा केली होती. त्याने नकार दिल्यानंतर मोबाईल बंद केला आणि दिंगबरचा संशय पक्का झाला. त्याने चुलत भाऊ मोहन दासरे याला घेऊन खरबळा गाव गाठले.

चहा घेतला, गप्पा मारल्या, लग्नाचे आश्वासन दिले आणि केला दगाफटका

त्याठिकाणी सर्वांशी आपुलकीने बोलून चहा घेतला. त्यानंतर पुजा आणि गोविंद या दोघांना लग्न लावून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर चौघे ही त्यांच्या गावाकडे जाण्यास निघाले. दिवशी-निगडी या रस्त्यावर आरोपी दिंगबर याने पूजा आणि गोविंदचा कोयत्याने गळा चिरून खून केला. त्यानंतर मुख्य आरोपी दिंगबर स्वत:हून भोकर पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. परिस्थितीजन्य पुराव्याआधारे भोकर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिंगबर याला फाशीची तर मोहन याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सदर शिक्षा कायम करण्यासाठी सरकारी पक्षाने हायकोर्टात धाव घेतली होती. तर आरोपींनी ही शिक्षेविरोधात अपील दाखल केले होते. औरंगाबाद खंडपीठात अतिरिक्त शासकीय अभियोक्ता राजेंद्र डासाळकर यांनी जोरदार युक्तीवाद करत सत्र न्यायालयाचा निकाल कायम करण्याची विनंती केली.

इतर बातम्या

Beed : बीडमध्ये गुंडांची दहशत, दिवसाढवळ्या तरूणावर धारदार शस्त्राने वार करुन हत्या

विनाकपड्यांवरच महिलेची चौकशी, आता भरावी लागणार २२ कोटींची नुकसानभरपाई!

Mira Bhayandar : मॅट्रीमनी साइटवरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत तरुणाची फसवणूक

(HC Confirm Death Penalty in Nanded Honour Killing case)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI