Video : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! काळजाचा ठोका चुकवणारी घटना कॅमेऱ्यात कैद

रेल्वे प्लॅटफॉर्मवर दोन टीसी उभे होते, इतक्यात हायटेन्शनवर वायर तुटली, पुढे जे झालं त्याने...

Video : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! काळजाचा ठोका चुकवणारी घटना कॅमेऱ्यात कैद
ही दृश्यं तुम्हाला विचलीत करु शकतातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Dec 10, 2022 | 1:40 PM

पश्चिम बंगाल : मृत्यू कुणालाही कुठेही, कधीही आणि कसाही गाठू शकतो, हे अनेकदा अधोरेखित झालंय. अशीच एक घटना पश्चिम बंगालमधील रेल्वे स्थानकात घडली. अचानक रेल्वेची हायटेन्शन इलेक्ट्रीक वायर तुटली. रेल्वे प्लॅटफॉर्मवर एकमेकांशी बोलत उभ्या असलेल्या टीसीवरच ही वायर येऊन आदळली. ही घटना इतकी भीषण होती की जागच्या जागीच एक टीसी कोसळला. त्यानंतर तो रेल्वे ट्रॅकवर देखील पडला. तर दुसरा टीसी अगदी थोडक्यात बचवाला. सोशल मीडियामध्ये या घटनेची व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही घटना पश्चिम मेदिनीपूर येथील खडगपूर रेल्वे स्थानकातील असल्याची माहिती समोर आली आहे. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, या प्रत्यत या घटनेतून आलाय.

खडगपूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर सुजान सिंह नावाचा एका टीसी दुसऱ्या एका टीसीसोबत बोलत उभा होता. इतक्यात वरुन एक उच्च विद्युत दाबाची तार खाली आली आणि ती समोर उभ्या असलेल्या टीसीवर पडली.

उच्च विद्युत दाबाच्या तारेच्या संपर्कात आल्यानं विजेचा तीव्र झटका या टीसीला बसला आणि हा टीसी जागच्या जागीच कोसळला. त्यानंतर तो रेल्वे ट्रॅकवरही पडला. या घटनेचा काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

जागीच या टीसीचा जीव गेलाय की काय, असं क्षणभर सगळ्यांना वाटलं. पण तो बेशुद्ध झाला होता. शिवाय रेल्वे ट्रॅकवर पडल्यानं त्याच्या डोक्यालाही मार लागली. पण या भीषण प्रसंगातून रेल्वेचा टीसी अगदी बालंबाल बचावलाय.

पाहा व्हिडीओ :

रेल्वे स्थानकाच्या फुटओव्हर ब्रीजसमोरच ही घटना घडली. आता या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. बुधवारी ही घटना घडली.

जखमी सुजान सिंह यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर या घटनेतून थोडक्यात बचावलेले दुसरे टीसी राजेश कुमार यांचाही जीव अगदी थोडक्यात वाचला आहे. राजेश कुमार यांनी आरपीएफ आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी सुजान सिंह यांनी तातडीने त्यांच्या जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. वेळीच उपचार मिळाल्यामुळे सुजान सिंह बचावले आहेत. आता त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत असल्याचंही डॉक्टरांनी म्हटलंय. दरम्यान,

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.