Nashik : चार घरांना लागलेल्या आगीत कुटुंबियांचा संसार जळाला, आगीचे कारण अस्पष्ट

महेश घोलप, Tv9 मराठी

Updated on: Jan 25, 2023 | 2:54 PM

ही घटना आज दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास घडली. आगीत चार घरांमधील साहित्य जळाले आहे. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेने त्वरित आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले

Nashik : चार घरांना लागलेल्या आगीत कुटुंबियांचा संसार जळाला, आगीचे कारण अस्पष्ट
आगीत घरं जळाली
Image Credit source: tv9marathi

नाशिक : नाशिकमधील (Nashik) म्हसरूळ (Masrul) येथील म्हसोबावाडी (Masobawadi) परिसरात विकास प्रकाश खरात यांच्या घराला अचानक आग लागली. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही घटना आज दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास घडली. आगीत चार घरांमधील साहित्य जळाले आहे. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेने त्वरित आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

या घटनेची माहिती मिळताच पंचवटी येथील अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेत संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या असून, घरांचे मोठे नुकसान झाले असल्याची समजली आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI