पती-पत्नीच्या नात्याला काळीमा ! लग्नानंतर सलग 15 वर्षे छळलं, आठवेळा गर्भपात, आता थेट तिला विष पाजलं

पती-पत्नीचं एका वेगळ्या स्तरावरचं नातं असतं. हे नातं एकमेकांच्या सान्निध्यात घट्ट होत जातं. हे नातं जितकं घट्ट होतं तितकं ते दाम्पत्य आणि त्यांचं कुटुंब सुखी आणि समाधानी असतं. पण काही ठिकाणी या गोष्टी अपवाद असतात.

पती-पत्नीच्या नात्याला काळीमा ! लग्नानंतर सलग 15 वर्षे छळलं, आठवेळा गर्भपात, आता थेट तिला विष पाजलं
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Oct 23, 2021 | 3:44 PM

रायपूर : पती-पत्नीचं एका वेगळ्या स्तरावरचं नातं असतं. हे नातं एकमेकांच्या सान्निध्यात घट्ट होत जातं. हे नातं जितकं घट्ट होतं तितकं ते दाम्पत्य आणि त्यांचं कुटुंब सुखी आणि समाधानी असतं. पण काही ठिकाणी या गोष्टी अपवाद असतात. काही माणसांना आपल्या पत्नीची जाणीव नसते. आपली पत्नी आपलं घरदार सोडून लग्न करुन आपल्या घरी आलीय. ती आपल्यासाठी तिची आपली माणसं सोडून आलीय. आपण तिचा आदर करायला हवा. तिला काय हवं नको ते बघायला हवं. पण काही माणसं इतके निष्ठूर असतात की, ते दारु पिवून आपल्या पत्नीला मारहाण करतात. ते पत्नीचा जीव घेण्यासही मागेपुढे बघत नाहीत. अशीच एक घटना छत्तीसगडमधून समोर आली आहे. एका पतीने आपल्या पत्नीला विष पाजवत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात नवऱ्याविरोधात रोष व्यक्त केला जातोय.

नेमकं प्रकरण काय?

संबंधित घटना ही छत्तीसगडच्या जांजगीर चांपा जिल्ह्यातून समोर आली आहे. जांजगीरच्या कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत वास्तव्यास असलेल्या देवनारायण नावाच्या व्यक्तीवर आपल्या पत्नीला विष पाजूवन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच तो गेल्या 15 वर्षांपासून आपली पत्नी सुमित्रा हिला मारहाण करत छळत आहे. त्याच्या अमानुष मारहाणीमुळे सुमित्राला 8 वेळा गर्भपात करावा लागला, असा आरोप देवनारायणवर आहे. पीडितेच्या आईने हे सर्व आरोप केले आहेत.

पीडितेच्या आईने नेमके काय आरोप केले आहेत?

सुमित्राची आई रमशिला बाई यांनी आपल्या जावयाविरोधात गंभीर आरोप केले आहेत. “माझी मुलगी सुमित्राचा गेल्या 15 वर्षांपूर्वी खोखरा गावच्या देवनारायणसोबत लग्न झालं होतं. देवनारायण दारु पितो हे सुमित्राला लग्नानंतर समजलं. लग्नानंतर काही दिवसांनीच देवनारायणने आपला रंग दाखवायला सुरुवात केली होती. तो पत्नीला वारंवार अमानुषपणे मारहाण करत. आरोपी देवनारायण काहीच काम करायचा नाही. माझी मुलगी सुमित्रा ही मजुरीचं काम करुन घराचा खर्च भागवायची. पती तिला मारहाण करुन तिच्याकडून पैसे हिसकवायचा. त्याने 21 ऑक्टोबरला सर्व सीमा पार केल्या. त्याने सुमित्राला प्रचंड मारहाण केली. त्यानंतर त्याने तिला जबरदस्ती विष पिऊ घातलं. अखेर तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं”, असं रमशिला बाईंनी सांगितलं.

पीडितेचा आठवेळा गर्भपात

“सुमित्राचा गेल्या 15 वर्षात आठवेळा गर्भपात झाला आहे. कारण तिचा पती तिला इतका मारहाण करायचा की गर्भपात व्हायचं. त्यामुळेच त्यांना आतापर्यंत एकही मुल नाही. देवनारायण 21 ऑक्टोबरला आपली पत्नी सुमित्राकडे दारु पिण्यासाठी पैशांची मागणी करत होता. पण सुमित्राने त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे रागावलेल्या पतीने तिला प्रचंड मारहाण केली. त्यानंतर तिला जबरदस्ती दारु पाजली. त्यामुळे सुमित्राची प्रकृती बिखघडली. सुमित्रावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत”, अशी माहिती पीडितेच्या आईने प्रसारमाध्यमांना दिली आहे.

हेही वाचा :

जातीय अत्याचाराच्या निषेधार्थ 100 दलितांनी गाव सोडलं; तलावाजवळ मुक्काम, महाराष्ट्राला झालंय काय?

गुगलवर सर्च केलं, ‘मुलीला कसं मारु’, 3 महिन्याच्या मुलीची निर्घृणपणे हत्या, आई म्हणावी की कसाई?

तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?.
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ.
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला.
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान.
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम.
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.