AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुगलवर सर्च केलं, ‘मुलीला कसं मारु’, 3 महिन्याच्या मुलीची निर्घृणपणे हत्या, आई म्हणावी की कसाई?

मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलीय. आपल्या तीन वर्षाच्या लेकीला आईने पाण्यात डुबवून मारलं आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे मुलीला मारायचं कसं हे तिने अगोदर गुगलवर सर्च केलं.

गुगलवर सर्च केलं, 'मुलीला कसं मारु', 3 महिन्याच्या मुलीची निर्घृणपणे हत्या, आई म्हणावी की कसाई?
आईने आपल्या तीन वर्षाच्या मुलीला पाण्यात डुबवून मारलं.
| Edited By: | Updated on: Oct 23, 2021 | 1:43 PM
Share

उज्जैन : मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलीय. आपल्या तीन वर्षाच्या लेकीला आईने पाण्यात डुबवून मारलं आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे मुलीला मारायचं कसं हे तिने अगोदर गुगलवर सर्च केलं. त्यानंतर तिने आपल्या मुलीचा मारण्याचा प्लॅन केला. या घटनेने उज्जैनसह मध्य प्रदेश हळहळलं आहे.

ही घटना उज्जैनच्या खाचरोड भागातील आहे. खाचरोड भागात राहणाऱ्या भटेवरा कुटुंबातील तीन महिन्यांच्या मुलीचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडला. पोलिसांचा संशय मुलीच्या आईवर होता आणि पुढे तपासाअंती तो संशय खरा निघाला.

मुलीला मारायचं कसं, गुगलवर शोधलं

मुलीचा खून आईनेच केला, असा पोलिसांना संशय होता. पोलिसांनी विविध अंगाने तपास केल्यावर आईने हत्येची कबुली दिली. विशेष म्हणजे हत्येपूर्वी आई गुगलवर सर्च करत राहिली की मुलीला बुडवून मारायचं कसं… 12 ऑक्टोबर रोजी आईने मुलीची हत्या केली. पोलिसांअगोदर पती अर्पित, सासू अनिता आणि सासरे सुभाष भाटेवा यांनीही मुलीच्या आईवरच खुनाचा संशय व्यक्त केला होता. पोलिसांप्रमाणेच त्यांचाही संशय खरा ठरला.

अर्पित भटेवरा यांची तीन महिन्याची मुलगी विरती बेपत्ता झाली होती. त्यांनी पोलिसांत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. खूप शोधाशोधीनंतर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये छोट्या चिमुरडीचा मृतदेह आढळला. खूप अंगांनी तपास केल्यावर आईनेच मुलीला पाण्याच्या टाकीत फेकल्याचं समोर आलं. क्रूर आईला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. स्वाती आणि अर्पितचं लग्न फेब्रुवारी 2019 साली झालं होतं.

बीडमध्ये नववीत शिकणाऱ्या मुलीचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

शाळेतून घरी परतत असताना नववीत शिकणाऱ्या मुलीची एका तरुणाने छेड काढली. अपमान सहन न झाल्याने मुलीने घरी येऊन विषारी औषध प्राशन केल्याची धक्कादायक घटना बीड तालुक्यातील गुंदा वडगाव या गावात घडलीय. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर बीडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बाळू खंदारे असं आरोपीचे नाव आहे. घटनेनंतर पिंपळनेर पोलिस घटनास्थळी धाव घेतली मात्र पीडित मुलगी अद्याप शुद्धीवर आली नसल्याने पोलिसांना तिचा जवाब घेता आला नाही. या घटनेमुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे.

छेडछाडीला कंटाळून मुलीने विष घेतलं

15 वर्षीय मुलीची गावातीलच एक अल्पवयीन मुलगा छेड काढत होता. तिला पाहून इशारे करणे, कमेंट करणे अशा पद्धतीने तो त्रास देत होता. 21 ऑक्टोबर रोजी सकाळी हाच प्रकार घडला. सततच्या छेडछाडीला कंटाळून मुलीने तिच्या घरी विषारी द्रव प्राशन केले. ही बाब आईच्या निदर्शनास आली, त्यानंतर तिला तातडीने बीडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या पीडितेवर उपचार सुरु आहेत.

घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब आघाव यांनी रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान मुलगी जवाब देण्याच्या परिस्थितीत नसल्याने पोलिसांनी कुटुंबियांना धीर देत जवाब नोंदवून घेऊ असा विश्वास दिला आहे.

हे ही वाचा :

अमरावतीत आर्थित विवंचनेतून शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या, मन सुन्न करणारी सुसाईड नोट समोर

8 ते 11 वर्षाच्या मुलांकडून 6 वर्षीय चिमुकलीसोबत भयावह कृत्य, आपली वाटचाल नेमकी कुठल्या दिशेला चाललीय?

पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.