जमिनीचा वाद टोकाला गेला, मग पतीला संताप अनावर झाला अन् पुढे अनर्थ घडला !

पतीने जमीन विकली. यावरुन पत्नी दररोज पतीशी वाद घालायची. एक दिवस हा वाद विकोपाला गेला. मग यातून पुढे जे झालं ते भयंकर होतं. ते उघड झालं ते पाहून पोलीसही चक्रावले.

जमिनीचा वाद टोकाला गेला, मग पतीला संताप अनावर झाला अन् पुढे अनर्थ घडला !
जमिनीच्या वादातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Apr 24, 2023 | 8:38 PM

धार : जमिनीवरुन पती-पत्नीमध्ये दररोज भांडण व्हायचे. या वादाला कंटाळून पतीने पत्नीचा काटा काढल्याची घटना मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात घडली आहे. पतीने पत्नीची हत्या करुन मृतदेह घराच्या मागे नेऊन जाळला. बरेच बहिणीशी काहीच संपर्क होत नव्हता. यामुळे महिलेचा भाऊ पोलीस ठाण्यात गेला अन् सर्व प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. धार येथील पिरीपुरा देहर गावात ही भीषण हत्या घडली. राधू असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण?

राधूने आपली एक जमीन विकली होती. या जमिनीवरुन त्याची पत्नी दयाबाई यांच्यात रोज भांडण होत होते. याआधीही या जमिनीच्या वादातून राधूने दयाबाईला मारहाण केली होती. यानंतर आता पुन्हा पती-पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि पतीने पत्नीची हत्याच केली. हत्या केल्यानंतर मृतदेह घराच्या मागे नेऊन जाळला. बहिणीशी खूप दिवस संपर्क झाला नाही म्हणून तिचा भाऊ राजाराम तिला भेटायला तिच्या सासरी आला.

हे सुद्धा वाचा

भावाने बहिण गायब असल्याची तक्रार दिली अन्…

मात्र बहिण घरी नव्हती. बहिणीबाबत भावोजी राधूला विचारले असता त्याने दयाबाई परिक्रमा करायला गेली आहे, असे सांगितले. मात्र राजारामला राधूच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. बहिणीची चिंता वाटल्याने त्याने थेट पोलीस ठाणे गाठले आणि बहिण बेपत्ता असल्याची तक्रार दिली. राजारामच्या तक्रारीवरुन पोलिसांनी फिर्याद नोंदवत दयाबाईच्या नवऱ्याला ताब्यात घेतले.

पतीची चौकशी केली असता सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मृतदेह जाळल्यानंतर हाडे जमिनीत गाडली. आरोपीच्या माहितीवनरुन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक टीमने हाडे हस्तगत केली असून, पुढील तपास करत आहेत.

Non Stop LIVE Update
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.