AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिल, चॅटिंग आणि व्हिडीओ कॉल… सनकी नवऱ्याचा पारा चढला, रिल स्टार पत्नीच्या डोक्यात फावडंच घातलं; नागपूर हादरलं

Crime News : नवऱ्याने रिल स्टार पत्नीच्या डोक्यात फावडंच घातलं, 'त्या' एका व्हिडीओ कॉलने सर्वकाही संपवलं... रविवारी काही तासांत असं काय घडलं... ज्यामुळे नागपूर हादरलं

रिल, चॅटिंग आणि व्हिडीओ कॉल... सनकी नवऱ्याचा पारा चढला, रिल स्टार पत्नीच्या डोक्यात फावडंच घातलं; नागपूर हादरलं
| Updated on: Oct 28, 2025 | 2:05 PM
Share

Crime News : पती – पत्नीमध्ये कायम वाद होत असतात, पण हे वाद टोकाला पोहोचल्यानंतर होत्यातं नव्हतं होतं… असंच काही नागपूर येथे घडलं आहे. नागपूरमध्ये एका पुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचे आरोप करत एका पतीने पत्नीला फावड्याने ठार मारले. फावड्याने डोक्यात वार केल्यानंतर पतीने पत्नील रुग्णालयात दाखल करण्याचं नाटक देखील केलं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. अखेर पोलीस तपासात धक्कादायक सत्य समोर आलं आहे.

मृत महिलेचं नाव रिंकी किशोर प्रधान (23) आणि आरोपी पती किशोर शंकर प्रधान (31) अशी त्यांची ओळख सांगण्यत येत आहे… पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार किशोर गॅरेजमध्ये काम करतो आणि मजदुरी देखील करतो..

काय आहे पूर्ण प्रकरण?

किशोर आणि रिंकी यांचं 5 वर्षांपूर्वी निधन झालं होतं. पण दोघांनी मुल नाही. याच दरम्यान, रिंकी हिचं नाव करण नावाच्या एका पुरुषासोबत जोडण्यात आलं. करण याचं रिंकीच्या घरी देखील येणं – जाणं सुरु होतं. याची माहिती किशोर याला शेजारच्यांनी दिली. तेव्हापासून दोघांमध्ये वाद सुरु झाले. किशोर याने रिंकीला समजावलं देखील…

वादानंतर अहमदाबाद पळून गेला

पती ने समजवून सांगितल्यानंतर देखील रिंकीने व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉलिंग आणि चॅटिंग सुरू केलं. किशोरने तेव्हाही तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण दोघांमध्ये जोरदार वाद झाला. पंचवीस दिवसांपूर्वी, रिंकी तिचा प्रियकर करणसोबत अहमदाबादला पळून गेल्याची माहिती देखील समोर येत आहे. अशात किशोरने नातेवाईकांची मदत घेतली आणि रिंकी नऊ दिवसांनी घरी परतली.

करण याला देखील समजावून सांगण्यात आलं… रिंकीने देखील माफी मागितली… काही दिवस सर्वकाही सुरळीत सुरु होतं… पण रिंकी हिने पुन्हा करण याच्यासोबत बोलण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये पुन्हा चॅट आणि व्हिडीओ कॉल सुरु झाले. रविवारी दुपारी किशोर घरी आल्यानंतर रिंकी, बॉयफ्रेंड सोबत बोलत असल्याचं किशोर याला कळलं… संतापलेल्या किशोरने घरातून एक फावडा उचलला आणि रिंकीच्या डोक्यावर वार केला. रक्त वाहू लागलं आणि रिंकी बेशुद्ध पडली.

घाबरलेल्या किशोर याने शेजारच्यांच्या मदतीने रिंकी हिला रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांनी रिंकीला मृत घोषित केलं. डॉक्टरांना संशय आल्यामुळे पोलीस चौकशी करण्यास सुरुवात झाली. याप्रकरणी अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलीस किशोर याच्या घरी पोहोचले. घटनास्थळी चौकशी केल्यानंतर पोलिसांना सत्य कळल आणि किरोश याने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी रिंकी हिचा पती किशोर याला ताब्यात घेतलं. आता याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.