chandrapur suicide : धक्कादायक! दोन मुलांसह महिलेने विहिरीत उडी मारली

दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आल्याने परिसर हादरून गेला आहे.

chandrapur suicide : धक्कादायक! दोन मुलांसह महिलेने विहिरीत उडी मारली

चंद्रपूर : जिल्ह्यातील ब्रम्हपुरीच्या मालडोंगरी येथे खळबळजनक प्रकार घडला आहे. दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आल्याने परिसर हादरून गेला आहे. पती-पत्नी दरम्यान सतत वाद होत असल्याने जीवन संपवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, परंतु खरे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र या घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे.

दीपा रवींद्र पारधी असे मृत महिलेचे नाव असून तिने आपल्या दोन चिमुकल्यांनाही सोबत घेऊन विहिरीत उडी मारल्याने त्यांचाही बुडून मृत्यू झाला आहे. मालडोंगरी येथील रवींद्र मुरलीधर पारधी आणि त्यांची पत्नी दीपा रवींद्र पारधी ह्या दोन मुलांसह राहत होते. घटनेच्या आधीच्या रात्री पती रवींद्र व पत्नी दीपा यांच्यामध्ये वाद झाल्यामुळे रागाच्या भरात पत्नी दीपा आपल्या दोन मुलांसह घरून निघून गेली. पती रवींद्र याने नातेवाईक- शेजार्‍यांसह शोधाशोध केली असता सकाळी मालडोंगरीकडे जाणाऱ्या मार्गालगत असलेल्या शेतातील विहिरीत गावकऱ्यांना दीपाचा मुलांसह मृतदेह तरंगताना दिसून आले.

त्यानंतर स्थानिकांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली. गावकऱ्यांच्या मदतीने तिन्ही मृतदेह बाहेर काढले. नेहमीच होणारे पती-पत्नीतील वाद यामागचे कारण असावे अशी शंका पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे, मात्र ठोस कारण अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाही, त्यामुळे ब्रह्मपुरी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

कटप्पाला कोरोनाची लागण; सत्यराज उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Goa Assembly Election 2022 : काँग्रेस, आपच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, कुणाला कुठून संधी?

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा कहर सुरुच, दिवसभरात 44 हजारापेक्षा अधिक रुग्ण, ओमिक्रॉन रुग्णांचा आकडाही दोनशे पार

Published On - 9:30 pm, Sun, 9 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI