CCTV Video : डोंबिवली ठाकुर्ली परिसरात चैन स्नॅचरची दहशत, इमारतीच्या आवारात घुसून चैन खेचली

चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली व बाहेर त्याचा साथीदार दुचाकी घेवून उभा होता, त्याच्या दुचाकीवर बसून धूम ठोकली. महिलेने चोराचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला.

CCTV Video : डोंबिवली ठाकुर्ली परिसरात चैन स्नॅचरची दहशत, इमारतीच्या आवारात घुसून चैन खेचली
डोंबिवली ठाकुर्ली परिसरात चैन स्नॅचरची दहशत
Image Credit source: TV9
सुनील जाधव

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jul 28, 2022 | 11:30 PM

डोंबिवली : डोंबिवलीत गुन्हेगारी थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. इमारतीच्या आवारात घुसून चोरट्याने महिलेची चैन खेचून (Chain Snatching) पोबारा केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीतील ठाकुर्ली परिसरात घडली आहे. ही धक्कादायक इमारतीच्या आवारातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस (Ram Nagar Police) ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. मात्र दिवसाढवळ्या इमारतीच्या आवारात अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

चोरट्याने महिलेची चैन हिसकावत दुचाकीवरु पसार झाला

ठाकुर्ली परिसरातील बालाजी आंगन परिसरात एका महिला दुपारी 4 च्या सुमारास मुलाला शाळेतून घेऊन घरी येत होती. महिला इमारतीच्या गेटमधून आत येत असतानाच मागून दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांपैकी एकाने बेसावध असताना तिच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली आणि पळ काढला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे महिलेसह तेथे उपस्थित असलेली शाळकरी मुलेही हादरुन गेली. चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली व बाहेर त्याचा साथीदार दुचाकी घेवून उभा होता, त्याच्या दुचाकीवर बसून धूम ठोकली. महिलेने चोराचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी डोंबिवली राम नगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आला आहे. मात्र भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे गुन्हेगारांना कायद्याची आणि पोलिसांची भीती राहिली नसल्याचे स्पष्ट होत आहे. (In Dombivli Thakurli, a womans chain was stolen within the premises of the building)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें