आधी आरडाओरडा झाला, मग एकच स्मशानशांतता पसरली, फ्लॅटमध्ये नक्की काय घडले?

इतरांप्रमाणे त्यांचेही सुखी कुटुंब होते. पण अचानक त्या कुटुंबाच्या सुखात मीठाचा खडा पडला अन् संपूर्ण कुटुंबच उद्धवस्त झाले.

आधी आरडाओरडा झाला, मग एकच स्मशानशांतता पसरली, फ्लॅटमध्ये नक्की काय घडले?
कौटुंबिक वादातून पत्नी आणि मुलीवर जीवघेणा हल्लाImage Credit source: istockphoto
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 1:11 PM

सूरत : राजधानी दिल्लीत एका अल्पवयीन मुलाच्या हत्येचे प्रकरण सध्या गाजत असतानाच सूरतमध्ये क्षुल्लक कारणातून बापाने आपल्या तरुण मुलीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सूरतमधील कडोदरा भागात ही घटना घडली असून, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रामानुज असे आरोपी पित्याचे नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. सूरतमधील सत्यनगर सोसायटीत रामानुज हे कुटुंबासह राहत होते. येथे ते भाड्याच्या घरात राहत होते. मुलीवर हल्ला करण्यापूर्वी आरोपीने पत्नीवरही हल्ला केला. पोलिसांनी आरोपी रामानुजन याला अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

एकामागोमाग एक 25 वार केले

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रामानुज आधी आपल्या पत्नीवर चाकूने हल्ला करत आहेत. यावेळी त्याची मुलेही घरीच आहेत. रामानुज आपल्या बायकोवर मुलांसमोर हल्ला करत असताना त्याची मुलगीही तिथे हजर असते. त्यानंतर रामानुजने मुलीकडे आपला मोर्चा वळवत तिच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात ती जागेवरच कोसळली. त्यानंतरही रामानुज थांबला नाही, त्याने एकामागून एक 25 वार केले. शेवटी तिचा जागीच मृत्यू झाला.

मुलगी छतावर झोपल्यावरुन वाद

मयत तरुणी घराच्या छतावर झोपायची. मात्र तरुण मुलीने छतावर झोपण्यास रामानुज यांचा विरोध होता. यावरुन पती-पत्नीमध्ये वाद होत होते. अखेर रामानुजला संताप अनावर झाला आणि त्याने पत्नीवर चाकूहल्ला केला. यात पत्नीचा जीव वाचला असून, ती गंभीर जखमी झाली आहे. यावेळी मुलाने मध्ये पडून वडिलांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. वडिलांचा रुद्रावतार पाहताच मुलाने तेथून पळ काढत आपला जीव वाचवला.

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.