AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन मुलांच्या आईचा फेसबुक मित्रावर जीव जडला, मग पैशासाठी प्रियकराचा अमानुष छळ केला, वाचा नेमके प्रकरण काय ?

साराने केनेडीवर आपल्या दोन वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप केला. त्यानंतर त्याचे अपहरण केले आणि त्याच्यावर गुन्हा कबूल करण्यासाठी दबाव टाकला. तब्बल 12 तास साराने त्याचा अमानुष छळ केला. डोक्यावर गरम पाणी टाकले, हातावर सिगरेटचे चटके दिले. डोक्यावर मारहाण केली.

तीन मुलांच्या आईचा फेसबुक मित्रावर जीव जडला, मग पैशासाठी प्रियकराचा अमानुष छळ केला, वाचा नेमके प्रकरण काय ?
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Feb 06, 2022 | 9:42 PM
Share

ब्रिटन : ब्युटी ट्रीटमेंटसाठी पैसे दिले नाही म्हणून एका तीन मुलांची आई असलेल्या 33 वर्षीय महिलेने प्रियकराचे अपहरण(Kidnapped) करुन त्याच्यावर विचित्र पद्धतीने अत्याचार केल्याची घटना ब्रिटनमध्ये घडली आहे. सारा डेविस(Sara Devis) असे आरोपी महिलेचे नाव आहे. साराने प्रियकरासोबत जे केले ते एकून सगळेच थक्क झाले आहेत. साराने आपल्या 40 वर्षीय प्रियकर मार्क केनेडी याचे 12 तास अपहरण केले. त्यानंतर त्याच्या डोक्यावर गरम पाणी ओतले. हाताला सिगरेटचे चटके दिले. डोक्यावर काठीने मारहाण केली. इतकेच नाही तर साराने त्याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात दिली. यावेळी साराचा एक मित्रही तिथे उपस्थित होता. याप्रकरणी केनेडी तक्रारीवरुन पोलिसांनी सारा आणि तिच्या मित्राला ताब्यात घेतले. न्यायालयाने दोघांनाही 6 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. (Inhumane harassment of a lover by a woman for money in Britain)

प्रियकराने पैसे दिले नाही म्हणून अद्दल घडवण्यासाठी कट रचला

‘डेली मेल’च्या वृत्तानुसार, यूकेच्या सॅल्फोर्डमध्ये राहणाऱ्या सारा आणि केनेडी यांची ओळख गेल्या वर्षी फेसबुकवरुन झाली होती. त्यानंतर दोघे एकत्र राहत होते. केनेडी याला त्याच्या वडिलोपार्जित मालमत्तेतून मोठी रक्कम मिळणार होती. साराला हे सर्व पैसे हडप करायचे होते. त्यासाठी तिने हा सर्व कट रचला. केनेडी याने साराला अनेक वेळा पैसे दिले होते, पण साराची मागणी वाढतच होती. साराने लिप बोटॉक्सची ट्रीटमेंट घेतली होती. या ट्रीटमेंटसाठी केनेडीने तिला पैसे द्यावे अशी तिची इच्छा होती. पण केनेडीने पैसे दिले नाहीत. यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी साराने हा भयंकर कट रचला.

प्रेयसी आणि तिच्या मित्राला 6 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

साराने केनेडीवर आपल्या दोन वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप केला. त्यानंतर त्याचे अपहरण केले आणि त्याच्यावर गुन्हा कबूल करण्यासाठी दबाव टाकला. तब्बल 12 तास साराने त्याचा अमानुष छळ केला. डोक्यावर गरम पाणी टाकले, हातावर सिगरेटचे चटके दिले. डोक्यावर मारहाण केली. गळा चिरण्याची, जीवे मारण्याची धमकी दिली. तर साराच्या मित्राने केनेडीच्या आईकडे त्याची सुटका करण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली. केनेडीने 12 तासानंतर कशीबशी साराच्या तावडीतून आपली सुटका करुन घेत पोलीस स्टेशन गाठले आणि घडला प्रकार कथन केला. त्यानंतर पोलिसांनी सारा आणि तिच्या मित्राला दोघांनाही ताब्यात घेतले. दोघांनीही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 6 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. (Inhumane harassment of a lover by a woman for money in Britain)

इतर बातम्या

Gondia Accident | लग्नाची तारीख ठरवून गावी निघाले, पण वाटेतच होत्याचं नव्हतं झालं! तिघे ठार

Dombivali Attack : डोंबिवलीतील पत्रकार हल्ला प्रकरणी चार जणांना अटक, म्होरक्याचा पोलिसांकडून शोध सुरु

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.