AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अकॅडमी उघडल्यामुळे ‘किलर डॅडी’ नाराज.. राधिका मर्डरची Inside Story

टेनिसपटू राधिका यादवचे वडील दीपक यादव म्हणाले की, मुलीच्या कमाईवर जगतो, असे म्हणत आजूबाजूचे लोक त्यांना टोमणे मारायचे. टेनिस सामन्यादरम्यान राधिकाच्या खांद्याला दुखापत झाली होती. म्हणूनच राधिकाने स्वतःची टेनिस अकादमी उघडली. पण तिच्या वडिलांना हे काही आवडलं नाही आणि त्यामुळेच त्यांनी पोटच्या लेकीच्या हत्या केली, अशी कबुली त्यांनी दिली.

अकॅडमी उघडल्यामुळे 'किलर डॅडी' नाराज.. राधिका मर्डरची Inside Story
राधिका मर्डरची Inside StoryImage Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Jul 11, 2025 | 9:07 AM
Share

दिल्ली-एनसीआरमधील गुरुग्रामच्या सेक्टर 57 मध्ये राष्ट्रीय टेनिसपटू राधिका यादवच्या हत्येने सर्वांना हादरवून टाकलंय. धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या राधिकाचे वडील दीपक यादव यांनीच केली. हत्येआधी दुपारी राधिका आणि तिच्या वडीलांमध्ये खूप मोठं भांडण झालं. त्यानंतर, रागाच्या भरात, राधिकाच्या वडिलांनी त्यांच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून त्यांच्याच पोटच्या लेकीवर एकामागून एक पाच गोळ्या झाडल्या. यापैकी तीन गोळ्या राधिकाला लागल्या आणि तिचा जागीच मृत्यू झाला. सगळ्यांना हादरवणाऱ्या या खुनाचा सध्या पोलिस तपास करत आहेत, पण दीपक यादव यांनी त्यांच्याच मुलीला, राधिकाला का मारलं असा प्रश्न सध्या सर्वांच्या मनात आहे.

टेनिसपटू राधिका यादवच्या वडिलांना अटक केल्यानंतर, गुरुग्राम पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये राधिका यादवच्या हत्येमागील कारण उघड झाले. राधिका यादवचे वडील दीपक यादव यांनी गुरुग्राम पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला. दीपक यादव म्हणाले की, टेनिस अकादमी उघडल्यामुळे ते त्यांची मुलगी राधिकावर बरेच रागावले होते. त्यांनी राधिकाला अकादमी बंद करण्यासाठी अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला होता, पण तिने ऐकले नाही.

मुलीच्या कमाईवर जगतो, खातो, लोक मारायचे टोमणे

मृत राधिकाचे वडील दीपक यादव यांच्या सांगण्यानुसार, त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांना त्यांच्या मुलीच्या पैशांवर जगण्याबद्दल टोमणे मारायचे. टेनिस सामन्यादरम्यान राधिकाच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे राधिकाने स्वतःची टेनिस अकादमी उघडली. आता लवकरच मैदानात परत येऊ शकणार नाही असलं राधिकाला वाटलं होतं. अशा परिस्थितीत, तिचा आणि तिच्या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी तिने एक अकादमी उघडण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून मुले तिथे टेनिस शिकण्यासाठी येऊ शकतील आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या फीमधून खर्च भागवता येईल असा तिचा विचार होता. मात्र तिच्या वडीलांना अकादमी उघडण्याचा हा निर्णय मान्य नव्हता. दीपक यादव म्हणाले की, मी तिला अकादमी बंद करण्यासाठी अनेक वेळा परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण तिने ऐकले नाही.

लायसन्स रिव्हॉल्वरमधून मारल्या 5 गोळ्या

राधिका यादवच्या हत्येची घटना सकाळी 10:30 वाजता घडली. राधिका सेक्टर-57 मधील घराच्या पहिल्या मजल्यावर स्वयंपाकघरात काम करत होती, तेव्हा तिच्या वडिलांनी, दीपक यादव यांनी त्यांची लायसन्स्ड रिव्हॉल्व्हर काढली आणि राधिकावर एकामागून एक पाच गोळ्या झाडल्या. यापैकी तीन गोळ्या राधिकाला लागल्या आणि तिचा मृत्यू झाला. घटनेच्या वेळी पहिल्या मजल्यावर फक्त तीन लोक उपस्थित होते, ते म्हणजे खुद्द दीपक, मुलगी राधिका आणि त्यांची पत्नी मंजू यादव. तर त्यांचा मुलगा घराबाहेर एका प्रॉपर्टी डीलरच्या दुकानात गेला होता.

किचनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

गोळीबाराचा आवाज ऐकून दीपकचा भाऊ आणि त्याचा मुलगा ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. राधिका स्वयंपाकघरात रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, तर गुन्ह्यात वापरलेले रिव्हॉल्व्हर खोलीतील टेबलावर ठेवले होते, ज्यामध्ये फक्त एक जिवंत काडतूस होते. दीपक यादवच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. राधिकाची आई मंजू यांच्या सांगण्यानुसार, घटनेच्या वेळी ती खोलीत होती. तिला फक्त गोळीबाराचा आवाज ऐकू आला. ताप आलामुळे ती खोलीत विश्रांती घेत होती, तेव्हाच गोळीबाराची ही घटना घडली.

राधिका यादव ही राष्ट्रीय स्तरावरील टेनिसपटू होती. तिने अनेक मोठ्या स्पर्धा जिंकल्या होत्या. राधिकाने अनेक पदके जिंकून तिच्या कुटुंबाचे नाव उंचावले होते. तिचा जन्म 23 मार्च 2000 साली झाला. तिने आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताचे प्रतिनिधित्व केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनमध्ये दुहेरी टेनिसपटूमध्ये तिचे रँकिंग 113 वे होते आणि आयटीएफ दुहेरीत ती टॉप 200 मध्ये होती.

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.