#क्राईम_किस्से : Nirupama Pathak | 22 वर्षीय गरोदर पत्रकार आढळलेली मृतावस्थेत, 2010 च्या प्रकरणात आई आणि प्रियकरही होते संशयाच्या फेऱ्यात

निरुपमा पाठकने कोडरमा जिल्ह्यातील झारखंडमधील चित्रगुप्त नगर कॉलनी येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. सुरुवातीला तिचा प्रियकर प्रियभंसू रंजनने तिच्या कुटुंबावर संशय व्यक्त केला होता. निरुपमा आणि आपल्या लग्नाला विरोध असल्याने त्यांनीच मुलीची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता.

#क्राईम_किस्से : Nirupama Pathak | 22 वर्षीय गरोदर पत्रकार आढळलेली मृतावस्थेत, 2010 च्या प्रकरणात आई आणि प्रियकरही होते संशयाच्या फेऱ्यात
Nirupama Pathak
अनिश बेंद्रे

|

Sep 02, 2021 | 4:35 PM

मुंबई : झारखंडच्या कोडरमा जिल्ह्यातील 22 वर्षीय पत्रकार निरुपमा पाठक (Nirupama Pathak) 29 एप्रिल 2010 रोजी राहत्या घरी मृतावस्थेत आढळली होती. निरुपमाची आई सुभा पाठक यांनी मुलीची हत्या केल्याचा संशय व्यक्त झाला होता. तसंच निरुपमाचा पत्रकार प्रियकर प्रियभंसू रंजनवरही तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप झाला होता. मात्र फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे आणि निरुपमाने स्वाक्षरी केलेल्या सुसाईड नोटच्या आधारे न्यायालयाने हत्येची शक्यता खोडून काढली होती. मृत्यूसमयी निरुपमा गर्भवती असल्याचंही पुढे आलं होतं.

नेमकं काय घडलं?

निरुपमा पाठकने कोडरमा जिल्ह्यातील झारखंडमधील चित्रगुप्त नगर कॉलनी येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. सुरुवातीला तिचा प्रियकर प्रियभंसू रंजनने तिच्या कुटुंबावर संशय व्यक्त केला होता. निरुपमा आणि आपल्या लग्नाला विरोध असल्याने त्यांनीच मुलीची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे हे प्रकरण ऑनर किलिंग असल्याचे वळण मिळाले होते.

त्यानंतर, निरुपमाची आई सुधा पाठक यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटकही करण्यात आली होती. तीन महिने न्यायालयीन कोठडीत राहिल्यानंतर त्यांना जामीन मिळाला. दरम्यान, कोलकाता येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत असे आढळून आले की सुसाईड नोटवरील स्वाक्षरी निरुपमाचीच होती, त्यामुळे तिची हत्या झाल्याची शक्यता मोडित निघाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

कोण होती निरुपमा पाठक?

झारखंडची रहिवासी असलेली 22 वर्षीय निरुपमा पाठक दिल्लीत एका दैनिकासाठी पत्रकार म्हणून काम करत होती. कोडरमा जिल्ह्यातील तिलया येथील तिच्या पालकांच्या घरात 29 एप्रिल 2010 रोजी ती संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळली होती. निरुपमाच्या कुटुंबीयांच्या सांगण्यावरुन तिचा प्रियकर रंजनविरोधात बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप

तिच्या आईने आरोप केला होता की, ही आत्महत्या असली तरी रंजनने तिला टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त केले आहे. शव विच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात निरुपमाचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाल्याचं नमूद करण्यात आलं होतं. तसंच ती गर्भवती असल्याचेही समोर आले होते. शवविच्छेदनादरम्यान तिच्या पोटात 10 ते 12 आठवड्यांचा गर्भ सापडला होता.

निरुपमा-रंजनच्या लग्नाला विरोध

निरुपमा आणि रंजन लग्नाचा विचार करत होते असा दावाही करण्यात आला होता. परंतु तिच्या पालकांना हा विवाह मान्य नव्हता, कारण तो कनिष्ठ जातीचा असल्याची निरुपमाच्या पालकांची भूमिका होती. निरुपमा आणि रंजन नवी दिल्लीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनमध्ये एकत्र शिकत होते. 6 मार्च 2010 रोजी दिल्लीतील आर्य समाज मंदिरात ते लग्न करणार होते.

निरुपमाने तिच्या मृत्यूच्या दिवशी पाठवलेल्या एसएमएसमध्ये तिने रंजनला धीर धरण्याचा सल्ला दिला होता. मी प्रयत्न करेन असे सांगत तिने त्याला कोणतेही टोकाचे पाऊल न उचलण्याचाही सल्ला दिला होता. मात्र काही तासांतच तीच मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती.

संबंधित बातम्या :

25 वर्षीय ब्युटीशियनचा गळा चिरला, आई-काकाने 2000 मध्ये केलेली हत्या

मैत्रिणीच्या भावांनी खून करुन मृतदेह जाळला, 2002 चे बहुचर्चित नितीश कटारा हत्याकांड

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें