मित्रावर विश्वास ठेवून फिरायला गेली, 13 वर्षांच्या विद्यार्थिनीवर सात जणांचा गँगरेप

अल्पवयीन मुलीची आपल्याच गावात राहणाऱ्या एका तरुणाशी मैत्री होती. फिरायला जाण्याचा बहाणा करत मित्र तिला निर्जन स्थळी घेऊन गेला. तिथे अन्य सहा जण आधीपासूनच लपून बसले होते.

मित्रावर विश्वास ठेवून फिरायला गेली, 13 वर्षांच्या विद्यार्थिनीवर सात जणांचा गँगरेप
झारखंडमध्ये अल्पवयीन तरुणीवर गँगरेप

रांची : फिरायला नेण्याच्या बहाण्याने बोलावून 13 वर्षांच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मित्रावर विश्वास ठेवून पीडिता त्याच्यासोबत फिरायला गेली होती, मात्र गैरफायदा घेत मित्राने आणखी सहा जणांसोबत तिच्यावर गँगरेप केल्याचा आरोप आहे. झारखंडमधील रांची शहरातील मांडर भागात हा घृणास्पद प्रकार घडल्याची माहिती आहे. पोलिसांनी छापेमारी करुन चार आरोपींना अटक केली आहे, तर पसार झालेल्या अन्य आरोपींचा शोध सुरु आहे.

नेमकं काय घडलं?

अल्पवयीन मुलीची आपल्याच गावात राहणाऱ्या एका तरुणाशी मैत्री होती. फिरायला जाण्याचा बहाणा करत मित्र तिला निर्जन स्थळी घेऊन गेला. तिथे अन्य सहा जण आधीपासूनच लपून बसले होते. अचानक समोर आलेल्या सहा जणांना पाहून पीडित विद्यार्थिनीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. घाबरुन तिने मित्राला आपल्या घरी सोडण्यास सांगितलं. मात्र मित्राने तिला आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास बळजबरी केली.

सात जणांकडून आळीपाळीने बलात्कार

पीडितेने नकार देताच मित्रासह अन्य सहा आरोपींनीही तिच्यावर जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. आपल्याला सोडण्यासाठी ती गयावया करत होती, मात्र नराधमांनी तिचं काही एक ऐकलं नाही. सातही जणांनी तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले.

अत्याचारांनंतर मैत्रिणीकडे सोडलं

पीडितेवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर रात्री उशिरा आरोपीने पीडितेला तिच्या मैत्रिणीच्या घरी सोडलं. रात्रभर ती मैत्रिणीच्या घरीच थांबली होती. भेदरलेल्या अवस्थेत सकाळी ती घरी गेली आणि आपल्यासोबत घडलेला प्रकार तिने कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी तिच्यासह पोलिस स्टेशनला धाव घेतल सामूहिक बलात्काराची तक्रार दाखल केली.

चार आरोपींना अटक

रांची पोलिसांनी या प्रकरणातील चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अन्य आरोपींची धरपकड करण्यासाठी पोलिसांची छापेमारी सुरु आहे. पोलिसांनी युवतीची वैद्यकीय तपासणी केली असून अधिक तपास सुरु आहे.

मध्य प्रदेशात महाविद्यालयीन तरुणीवर गँगरेप

दुसरीकडे, मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली होती. अंमली पदार्थ देऊन तिघा मित्रांनीच तिच्यावर गँगरेप केल्याचा आरोप आहे. एका खासगी महाविद्यालयात प्रथम वर्षाचं शिक्षण घेणारी विद्यार्थिनी आपली मैत्रीण आणि तीन तरुणांसह मांडव भागात फिरायला गेली होती. रात्री घरी येताना तिला एका तरुणाने कोल्ड ड्रिंकमधून अंमली पदार्थ घालून दिला. ती बेशुद्ध झाल्यानंतर तिघे आरोपी तिला एका फ्लॅटमध्ये घेऊन गेले. तिथे त्यांनी आळीपाळीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप झाला होता.

संबंधित बातम्या :

फिरायला गेलेल्या विद्यार्थिनीवर तीन मित्रांकडूनच गँगरेप, अश्लील व्हिडीओ बनवल्याचाही दावा

पुण्यात सराईत बाल गुन्हेगारांकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार सामूहिक बलात्कार, कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी

चार अल्पवयीन मुलांनी गाठलं, 65 वर्षीय महिलेवर रेल्वे क्रॉसिंगजवळ गँगरेप

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI