रश्मी ठाकरेंबद्दल वादग्रस्त ट्विट प्रकरणी साडेपाच तासांच्या चौकशीनंतर जितेन गजारीयाची सुटका

रश्मी ठाकरेंबद्दल वादग्रस्त ट्विट प्रकरणी साडेपाच तासांच्या चौकशीनंतर जितेन गजारीयाची सुटका
रश्मी ठाकरें

दरम्यान गजारीयाच्या ट्विटनंतर शिवसेनेच्या महिला नेत्यांनीही भाजपवर चांगलीच टीकेची झोड उठवली आहे. रश्मी ठाकरेंवर अशा प्रकारची टीका होणे नींदनीय असल्याचे शिवसेनेच्या महिला नेत्यांनी म्हटले आहे. भाजपने अशी माणसं पगार देऊन ठेवली असल्याची टीका शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी केली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 06, 2022 | 9:42 PM

मुंबई : रश्मी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केल्याप्रकरणी जितेंन गजारिया याची मुंबई पोलीस सायबर सेलकडून साडेपाच तास चौकशी करण्यात आली. आक्षेपहार्य 2 ट्विटच्या संदर्भात सायबर सेलच्या डीसीपी रश्मी करंदीकर यांनी जितेंद्र गजारीया याचा संपूर्ण जबाब नोंदवलेला आहे. पोलिसांना जे काही सहकार्य लागेल ते आम्ही त्यांना करू मात्र ही सरकारची दडपशाही असल्याचा आरोप जितेन गजारिया याच्या वकील यांनी केला आहे. रश्मी ठाकरे यांच्याबद्दल ट्विटरवर मराठी राबडी देवी असे ट्विट गजारीयाने केले होते. त्यानंतर गजारीयाला ताब्यात घेण्यात आले. गजारीया हा भाजपचा पदाधिकारी आहे.

उद्धव ठाकरेंच्या तब्येतीवरुन भाजपकडून सतत टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीवरुन गेल्या काही दिवसांपासून सतत टीका होत आहे. गेल्या अधिवेशनातही भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर बरीच टीका केली होती. मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी वाटून द्यावी असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, तर मुख्यमंत्र्यांचा मुलावर विश्वास नसेल तर रश्मी वहिनींना चार्ज द्यावा अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

दरम्यान गजारीयाच्या ट्विटनंतर शिवसेनेच्या महिला नेत्यांनीही भाजपवर चांगलीच टीकेची झोड उठवली आहे. रश्मी ठाकरेंवर अशा प्रकारची टीका होणे नींदनीय असल्याचे शिवसेनेच्या महिला नेत्यांनी म्हटले आहे. भाजपने अशी माणसं पगार देऊन ठेवली असल्याची टीका शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी केली आहे.

पुण्यातही गजारीया विरोधात सायबर सेलकडे गुन्हा दाखल

रश्मी ठाकरे यांच्याबद्दल बदनामीकारक ट्विट करणाऱ्या जतिन गजारीया विरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. शिवसेनेचे उप शहर संघटक उमेश वाघ यांनी गजारीया विरोधात तक्रार दाखल केली आहे. गजारीया विरोधात कलम 153अ, 500(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस पुढील तपास करत आहेत. (Jiten Gazaria released after five-and-a-half hours of inquiry into controversial tweet about Rashmi Thackeray)

इतर बातम्या

मस्ती भोवली! तलवारीने केक कापून दहशत पसरवण्याचा प्रयत्न, पोलिसांनी तरुणांना ठोकल्या बेड्या

Virar Accident: मुंबई अहमदाबाद महामार्गावर दोन ऑइल टँकरचा भीषण अपघात; अपघातात दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें