Kalicharan : कालीचरण बाबाला एक दिवसाची पोलीस कोठडी, पुणे सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा

Kalicharan : कालीचरण बाबाला एक दिवसाची पोलीस कोठडी, पुणे सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा
कालीचरण बाबाला ठाणे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

आम्ही महात्मा नथुराम गोडसेच म्हणणार, कालीचरण महाराज काहीही चुकीचे बोलले नाहीत. मात्र, पुणे पोलीस त्यांना आणि त्याचे भक्त असणाऱ्या आम्हाला चुकीची वागणूक देत असल्याचा आरोप कालीचरण महाराजांच्या भक्तांनी केला आहे.

अश्विनी सातव डोके

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 05, 2022 | 8:55 PM

पुणे : महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या कालीचरण महाराजाला अटक केल्यानंतर आज पुणे पोलीसांनी त्याला आज पुणे सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कालीचरण महाराजासोबत धार्मिक भावना भडकावल्याबद्दल पुण्यातील खडकमाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय.

9 डिसेंबरला पुण्यातील नातूबागेत झालेल्या कार्यक्रमात भडकाऊ भाषण केले

या प्रकरणातील मिलिंद एकबोटे, रमाकांत एकबोटे, दिपक नागपुरे, मोहन शेटे आणि कॅप्टन दिगेंद्र कुमार हे आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी कालीचरणची कोठडी आवश्यक असल्याचं पोलिसांनी न्यायालयात सांगितलं. त्याचबरोबर कालीचरण महाराजाचे व्हॉईस सॅम्पल घ्यायचे आहेत आणि इतर आरोपींसोबत मिळून कालीचरणचा दंगल भडकावण्याचा प्रयत्न होता का याचीही चौकशी करायची असल्याच पोलीसांनी न्यायालयात सांगितलंय. 19 डिसेंबरला पुण्यातील नातूबागेत झालेल्या कार्यक्रमात कालीचरण आणि आणि इतर आरोपींनी भडकाऊ भाषण केल्याचा गुन्हा पोलीसांनी नोंद केलाय. या गुन्ह्यात कालीचरणला छत्तीसगडमधून आज पुण्यात आनण्यात आलं आणि न्यायालयात हजर करण्यात आलं.

दरम्यान, आम्ही महात्मा नथुराम गोडसेच म्हणणार, कालीचरण महाराज काहीही चुकीचे बोलले नाहीत. मात्र, पुणे पोलीस त्यांना आणि त्याचे भक्त असणाऱ्या आम्हाला चुकीची वागणूक देत असल्याचा आरोप कालीचरण महाराजांच्या भक्तांनी केला आहे. पोलीस आणि कालीचरण महाराज यांच्या भक्तांमध्ये यावेळी बाचाबाची झाली.

कल्याणमध्येही कालीचरण बाबा विरोधात गुन्हा दाखल

कल्याणमधील एका खाजगी संस्थेच्या कार्यक्रमात 10 डिसेंबर रोजी महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याविषयी कालीचरण बाबाने वादग्रस्त विधान केले होते. याप्रकरणी मंगळवारी कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तथाकथीत बाबाच्या विरोधात अजामिनपात्र गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला आहे. (Kalicharan Baba was remanded in police custody for one day by the Pune Sessions Court)

इतर बातम्या

अमेरिकेतून आलेल्या वराला ब्लॅकमेल करणं भोवलं, मुलीसह कुटुंबियांवर गुन्हा, प्रकरण काय? वाचा सविस्तर

Solapur: सोलापूरमध्ये शेततळ्यांमध्ये पाणी पिण्यास गेलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा बुडून मृत्यू

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें