Solapur: सोलापूरमध्ये शेततळ्यांमध्ये पाणी पिण्यास गेलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा बुडून मृत्यू

Solapur: सोलापूरमध्ये शेततळ्यांमध्ये पाणी पिण्यास गेलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा बुडून मृत्यू
प्रातिनिधिक छायाचित्र

या घटनेमुळे मार्डी गावावर शोककळा पसरली आहे. तिन्ही मुली गरीब कुटुंबातील असून पाणी पिण्यासाठी गेल्या असताना असा दुर्दैवी मृत्यू आल्याने जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

रोहित पाटील

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 05, 2022 | 6:23 PM

सोलापूर : शेततळ्यांमध्ये पाणी पिण्यास गेलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा तळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोलापूरमध्ये घडली आहे. सानिका गरड (17), पूजा गरड (अंदाजे 13) आकांक्षा युवराज वडजे (11) असे बुडून मरण पावलेल्या मुलींची नावे आहेत. या घटनेमुळे मार्डी गावावर शोककळा पसरली आहे.

पाणी पिण्यासाठी गेल्या असता तळ्यात पाय घसरुन पडल्या

मार्डी गावात राहणाऱ्या सानिका, पूजा, आकांक्षा या तिघी जणी दुपारी 1 च्या सुमारास रानात जळण गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. जळण गोळा करत असताना त्यांना खूप तहान लागली. म्हणून त्या जवळच असलेल्या शेतातील शेततळ्यात पाणी पिण्यासाठी गेल्या. पिण्या पिण्यासाठी तळ्यावर गेल्या असता त्यांचा पाय घसरला आणि तिघीही पाण्यात पडल्या. तिघींनाही पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हे शेत सदाशिव जगताप नावाच्या इसमाच्या मालकीचे आहे.

या घटनेमुळे मार्डी गावावर शोककळा पसरली आहे. तिन्ही मुली गरीब कुटुंबातील असून पाणी पिण्यासाठी गेल्या असताना असा दुर्दैवी मृत्यू आल्याने जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस घटनेचा पंचनामा करीत आहेत.

काही दिवसांपूर्वी नांदेडमध्येही घडली होती अशी घटना

शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी नांदेडमधील देगलूर तालुक्यात कावळगड्डा गावात घडली होती. अक्षय रोहिदास राजुरे(11) आणि प्रमोद हनुमंत राजुरे(10) अशी मयत मुलांची नावे आहेत. अक्षय हा पाचवी इयत्तेत तर प्रमोद चौथ्या इयत्तेत शिकत होता. तीन शाळकरी मुले खेळता खेळता गावाजवळील एका शेतात अर्धवट असलेल्या शेततळ्याजवळील गेली. शेततळे तुडूंब भरलेले होते. यापैकी एक मुलगा शौचास गेला तर बाकी दोघे अक्षय आणि प्रमोद शेततळ्यात पोहण्यासाठी उतरले. मात्र तळ्यात गाळ असल्याने ते दोघेही गाळा रुतल्याने त्यांचा मृ्त्यू झाला. शौचास गेलेल्या मुलाने गावाकडे जाऊन गावकऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढले.

इतर बातम्या

Video | एक दोनदा नाही, 16 वेळा चावला! चिमुरडीचा पाठलाग करत कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

Dombivali Crime: पाच लाख रुपयांसाठी वृ्द्ध शिपिंग एजंटचे अपहरण, मानपाडा पोलिसांकडून तिघांना अटक

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें