कर्जबाजारी झाला म्हणून भिवंडीतून कल्याणमध्ये आला, मग थेट तुरुंगात गेला, काय घडलं नेमकं?

तो कर्जबाजारी झाला होता. कर्ज कसं फेडायचं या विवंचनेत असतानाच त्याला नामी शक्कल सुचली. पण यानंतर तो थेट पोलीस ठाण्यातच गेला.

कर्जबाजारी झाला म्हणून भिवंडीतून कल्याणमध्ये आला, मग थेट तुरुंगात गेला, काय घडलं नेमकं?
महिलेचे मंगळसूत्र चोरुन पळणाऱ्या चोरट्याला बेड्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 13, 2023 | 2:40 PM

कल्याण : कर्ज फेडण्यासाठी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळ काढणाऱ्या चोरट्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अंधाराचा फायदा घेत दीड लाखाचे मंगळसूत्र घेऊन चोराने पळ काढला. पण महिलेने आरडाओरडा केल्याने स्टेशनवर ग्रस्त घालत असलेल्या कल्याण लोहमार्ग पोलिसांनी चोराला पकडले. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कर्जबाजारी झाल्याने चोरीचा रस्ता निवडत भिवंडीमधून कल्याण स्टेशनवर चोरी करण्यासाठी आला, अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला. रोशन नथू पाटील असे आरोपीचे नाव आहे.

कर्ज फेडण्यासाठी तो बनला चोर

भिवंडीच्या दौडा वडवली परिसरात राहणारा 29 वर्षीय रोशन हा कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे कर्जमुक्त होण्यासाठी त्याने चोरीचा मार्ग निवडला. यासाठी भिवंडीवरून त्याने कल्याण स्टेशन गाठले. रात्री अंधारात स्टेशनची पूर्ण पाहणी करून अंधार असलेल्या जिन्यावर तो सोनं घालून येणाऱ्या महिलेची वाट पाहू लागला. रात्री तीनच्या दरम्यान त्याला एक महिला मोठा सोन्याचा हार घालून येताना दिसली. मग काय आरोपीने अंधाराचा फायदा घेत तिच्या गळ्यातील सोन्यावर आपला हात साफ केला. हार खेचत त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

महिलेचा आरडाओरडा ऐकून पोलीस धावले

यावेळी महिलेने मोठमोठ्याने आरडाओरडा करत चोरट्याचा पाठलाग सुरू केला. महिलेचा आरडाओरडा ऐकून स्टेशन परिसरात तैनात असलेल्या कल्याण लोहमार्ग पोलिसांनी आणि कल्याण रेल्वे पोलिसांनी लगेचच आरोपीच्या दिशेने धावत आरोपीचा पाठलाग केला. अखेर पोलिसांनी झडप घालत त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आढळले. सध्या या आरोपीवर कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. आरोपीसोबत अजून कोण कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत.

हे सुद्धा वाचा

तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?.
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ.
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला.
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान.
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम.
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.