IT सॉफ्टवेअर इंजीनिअरने संपवलं जीवन, RSS च्या स्वयंसेवकांवर लावला खळबळजनक लैंगिक शोषणाचा आरोप
नोटमध्ये त्याने लिहिलेलं की, त्याच्या आई-वडिलांनी लहानपणी त्याला संघाच्या शाखेत टाकलं. अवघं तीन वर्षांच वय असताना शेजारी राहणाऱ्या एनएमने माझं शोषण केलं, असं त्याने म्हटलेलं. त्याशिवाय एसएसके आयटीसी आणि ओटीसी कॅम्पमध्ये सुद्धा त्याच्यासोबत असच झालं.

केरळमधील 26 वर्षीय सॉफ्टवेअर इंजीनिअर आनंदु अजी याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या करुन जीवन संपवलं होतं. तो कोट्टायम येथे रहायचा. तिरुवनंतपुरमच्या थंबानूर येथील एका लॉजमध्ये आनंदु अजीचा मृतदेह मिळाला होता. सुसाइड करण्यापूर्वी आनंदुने इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS वर लैंगिक शोषणाचा आरोप केला. बालपणापासून आतापर्यंत त्याचं कसं लैंगिक शोषण झालं, या बद्दल त्याने सांगितलं. हे प्रकरण समोर आल्यानंतर अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. काँग्रेसने यावरुन संघावर म्हणजे RSS वर हल्लाबोल केला आहे. सोबतच या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
सुसाइड करण्यापूर्वी आनंदु अजीने एक नोट लिहिली. त्यात त्याने बालपणापासून आतापर्यंत कसं लैंगिक शोषण झालं या बद्दल एक्सप्लेन केलेलं. नोटमध्ये त्याने लिहिलेलं की, त्याच्या आई-वडिलांनी लहानपणी त्याला संघाच्या शाखेत टाकलं. अवघं तीन वर्षांच वय असताना शेजारी राहणाऱ्या एनएमने माझं शोषण केलं, असं त्याने म्हटलेलं. त्याशिवाय एसएसके आयटीसी आणि ओटीसी कॅम्पमध्ये सुद्धा त्याच्यासोबत असच झालं. माझ्या मृत्यूचं कारण कुठलं नातं नाही, तर मनावर झालेला आघात आहे असं आनंदु अजीने सुसाइड नोटमध्ये लिहिलेलं. काही वर्षांपूर्वी त्याला समजलं की, त्याला ऑब्सेसिव-कंपल्सिव डिसऑर्डर (OCD) हा आजार आहे.
RSS वाल्यांशी मैत्री करु नका
आनंदु अजीने लिहिलय की संघामुळे त्याला नेहमी त्रासच झाला. पण त्यानंतरही त्याची कोणावर नाराजी नाहीय. “एनएम संघाचा एका सक्रीय सदस्य नेहमी माझं शोषण करायचा. मी जेव्हा कॅम्पमध्ये जायचो, माझं शोषण केलं जायचं. त्याशिवाय दांड्यांनी अनेकदा मारहाण सुद्धा केली” असं आनंदु अजीने लिहिलय. “RSS वाल्यांशी मैत्री करु नका. भले पिता, भाऊ किंवा मुलगा असेल तर दूर ठेवा. माझ्याकडे याचे पुरावे नाहीत. पण माझं आयुष्य याचा पुरावा आहे. बालपणाची ट्रॉमा अजूनही कायम आहे. जगातल्या कुठल्याही मुलाच्या वाट्याला असा त्रास येऊ नये” असं आनंदु अजीने लिहिलय
The RSS must allow these allegations to be investigated fully. In his suicide message Anandu Aji alleged that he was abused again and again by multiple members of the RSS.
He clearly stated that he was not the only victim and rampant sexual abuse is taking place in RSS camps.… pic.twitter.com/IS4dDaQv7O
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 12, 2025
प्रियंका गांधी वाड्रा यांची मागणी काय?
अनंदु अजीच्या मृत्यूनंतर हा राजकीय मुद्दा बनला आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी आनंदु अजी आत्महत्या प्रकरणात आरएसएसवरील लैंगिक शोषणाच्या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. प्रियंका गांधी यांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे की, त्याने आपल्या सुसाइड नोटमध्ये म्हटलय की, अनेकदा त्याला आरएसएस सदस्यांकडून गैरवर्तणुकीचा सामना करावा लागला.
