ऊसतोडणीला नकार दिला म्हणून मजूर महिलेचं अपहरण, मुकादमाविरोधात गुन्हा

दत्ता कानवटे

| Edited By: |

Updated on: Sep 07, 2021 | 11:39 AM

ऊसतोडणीला नकार दिला म्हणून मजूर महिलेचं मुकादमाने अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. औरंगाबादमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित मुकादमाविरोधात औरंगाबादच्या वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऊसतोडणीला नकार दिला म्हणून मजूर महिलेचं अपहरण, मुकादमाविरोधात गुन्हा
Aurangabad police
Follow us

औरंगाबाद : ऊसतोडणीला नकार दिला म्हणून मजूर महिलेचं मुकादमाने अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. औरंगाबादमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित मुकादमाविरोधात औरंगाबादच्या वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिराबाई घायतडक असे अपहरण झालेल्या 42 वर्षीय ऊसतोड महिलेचे नाव आहे. मी आजारी आहे, म्हणून सध्या ऊसतोडणी करु शकत नाही, असं कारण तिने संबंधित मुकादमाला सांगितलं. मात्र हिराबाईंच्या उत्तराने भडकलेल्या मुकादमाने उचल दिलेल्या रकमेसाठी त्यांचं अपहरण केल्याचा आरोप आहे.

उचल दिलल्या रकमेसाठी महिलेचं अपहरण

मुकादम राजेंद्र टकाणखार यांनी उचल दिलेल्या रकमेसाठी औरंगाबादेतील रांजणगाव येथून हिराबाईंचं अपहरण केल्याची माहिती समोर येतीय. हिराबाईंना कामाच्या आधी त्यांनी काही रक्कम उचल म्हणून दिली होती. परंतु आता रक्कम फेडण्याची वेळ येताच त्या आजापणाचं कारण सांगत असल्याची शक्यता मनात ठेऊन मुकादमाने अपहरण केल्याची चर्चा आहे.

हिराबाईंच्या शोधासाठी औरंगाबाद पोलिसांचे पथक बीड जिल्ह्यातील माजलगावकडे रवाना झालं आहे. मुकादम राजेंद्र टकाणखारसह आणखी तिघांविरोधात औरंगाबाद एम.आय.डी. सी. वाळूज पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

औरंगाबादेतलं घंटानाद आंदोलन भोवलं, मनसेच्या 20 ते 30 पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

दुसरीकडे औरंगाबाद मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. कोरोनाचे नियम मोडल्या प्रकरणी पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मंदिरे सुरू करण्यासाठी मनसेने घंटानाद आंदोलन केलं होतं. 20 ते 30 पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सिटी चौक पोलीस ठाण्यात कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

(Kidnapping of Sugarcane Working woman for money, case registered at Aurangabad police station)

हे ही वाचा :

औरंगाबादेत गुंडगिरी सुरुच, गेटसमोर थांबू नका सांगितल्याचा राग, टोळक्याची तोडफोड

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI