लोकमंगल मल्टिस्टेट बनावट कागदपत्रे प्रकरण, माजी सहकार मंत्र्याच्या मुलासह नऊ संचालकांविरोधात दोषारोपपत्र दाखल

या नऊ संचालकामध्ये माजी सहकार मंत्री तथा भाजप आमदार सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख, भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह अन्य सात जणांचा समावेश आहे

लोकमंगल मल्टिस्टेट बनावट कागदपत्रे प्रकरण, माजी सहकार मंत्र्याच्या मुलासह नऊ संचालकांविरोधात दोषारोपपत्र दाखल
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 2:05 PM

सोलापूर : सोलापुरात लोकमंगल मल्टिस्टेट को. ऑपरेटीव्ह सोसायटीच्या तत्कालीन नऊ संचालकांविरुद्ध (Lokmangal Multistate Cooperative Society Case) न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या नऊ संचालकामध्ये माजी सहकार मंत्री तथा भाजप आमदार सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख, भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह अन्य सात जणांचा समावेश आहे (Lokmangal Multistate Cooperative Society Case).

लोकमंगल मल्टिस्टेटने दूध भुकटी निर्मिती आणि विस्तारित दुग्धशाळा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्यासाठी पाच कोटींचे अनुदान घेतले होते. मात्र, या प्रकल्पासाठी बनावट कागपत्रे सादर केल्याची तक्रार राष्ट्रवादीचे अप्पाराव कोरे यांनी केली होती. त्यानंतर हा प्रस्ताव रद्द करण्यात आला होता. त्यानंतर तत्कालीन जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी पांडुरंग येडगे यांनी सदर बझार पोलिसात 28 नोव्हेंबर 2018 ला तक्रार दिली होती. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.

2015 मध्ये उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ येथील रोहन देशमुख चेअरमन असलेल्या लोकमंगल मल्टिस्टेट को. ऑपरेटीव्ह सोसायटी यांच्यामार्फत शासनाकडे दूध भुकटी निर्मिती आणि विस्तारित दुग्ध शाळेचा प्रस्ताव पाठवला होता. त्यासाठी लागणारी काही आवश्यक कागदपत्रे बनावट सादर केली गेली.

मात्र, यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याची तक्रार राष्ट्रवादीचे अप्पाराव कोरे यांनी दुग्ध विकास पशुसंवर्धन कार्यालयात केली होती. त्यानुसार चौकशीदरम्यान काही कागदपत्रे बनावट आढळली. त्याच दरम्यान शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानापैकी पन्नास टक्के म्हणजे पाच कोटी रुपये पतसंस्थेच्या जॉईंट खाते महाराष्ट्र बँकेत जमा झाले होते (Lokmangal Multistate Cooprative Society Case).

चौकशी चालू असताना ते पैसे काढले नाहीत. नंतर हा प्रस्ताव रद्द झाला. आलेल्या तक्रारीनुसार चौकशी करुन पोलिसात तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार, गुन्हा दाखल झाला. आर्थिक गुन्हे शाखेने तपास करुन रोहन सुभाष देशमुख, रामराज राजसाहेब पाटील, अविनाश लक्ष्मण महागावकर, प्रकाश वैजीनाथ लातुरे, सचिन पंचप्पा कल्याणशेट्टी, बशीर बादशाह शेख, मुरारी सारंग शिंदे, हरिभाऊ धनाजी चौगुले, भीमाशंकर सिद्राम नरसगोडे या संचालकांविरुद्ध दोषारोप पत्र सादर केले आहे.

Lokmangal Multistate Cooperative Society Case

संबंधित बातम्या :

जुनं भांडण पुन्हा नव्याने उकरलं, दोन गट आपसांत भिडले, तडीपार गुंडांकडून हत्या, नाशिकमध्ये खळबळ

‘जीवनसाथी’वरुन ओळख, यूकेमध्ये MD असल्याची बतावणी, कल्याणच्या तरुणीला 16 लाखांचा गंडा

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.