घरमालकाच्या ज्या मुलाला राखी बांधली, त्याचाच मित्रासोबत चिमुरडीवर गँगरेप

12 वर्षांच्या चिमुरडीवर घरमालकाचा मुलगा आणि त्याच्या मित्रानेच सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे (Madhya Pradesh Rape Land Lord's son)

घरमालकाच्या ज्या मुलाला राखी बांधली, त्याचाच मित्रासोबत चिमुरडीवर गँगरेप
मध्य प्रदेशात घरमालकाच्या मुलाकडून बालिकेवर अत्याचार

भोपाळ : मध्य प्रदेशात 12 वर्षांच्या चिमुरडीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बालिका आपल्या कुटुंबासह भाड्याने राहत असलेल्या घराच्या मालकाच्या मुलानेच मित्रासह तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. लाजिरवाणी गोष्ट म्हणजे ही चिमुकली घरमालकाच्या आरोपी मुलाला दादा मानून राखी बांधत असे. (Madhya Pradesh Crime Gwalior Rape Land Lord’s son Raped Girl with Friend)

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 12 वर्षांच्या चिमुरडीवर घरमालकाचा मुलगा आणि त्याच्या मित्रानेच सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. दोन्ही आरोपींना अटक करुन पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती ग्वाल्हेरचे एसपी अमित सांघी यांनी दिली.

जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार

ग्वाल्हेरमधील ‘चार शहर का नाका’ या भागात पीडित 12 वर्षांची चिमुरडी आपल्या कुटुंबासह भाड्याच्या घरात राहत होती. बालिका गेल्या आठवड्यात आपल्या खोलीतून बाहेर आली, तेव्हा घरमालकाचा मुलगा नीलू आणि त्याचा मित्र सत्यम तिथे होते. दोघांनी बालिकेचे तोंड दाबून तिला आपल्या खोलीत उचलून नेले. तिला जीवे ठार मारण्याची धमकी देत नीलूने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

घरातील सदस्य जागे झाले आणि…

नीलूनंतर सत्यमनेही तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, मात्र इतक्यात घरात राहणारे इतर भाडेकरुही जागे झाले. संधीचा फायदा उचलत बालिकेने आरोपींना धक्का दिला आणि पळ काढला. घरी धाव घेत तिने आपल्यासोबत झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. त्यानंतर चिमुरडीला घेऊन कुटुंबाने पोलीस स्टेशन गाठलं.

बालिका दोन्ही आरोपींना भाऊ मानत असे

पोलिसांनी आरोपी नीलू आणि सत्यमविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन पीडित बालिका दोन्ही आरोपींना भाऊ मानत असे. तिने हात जोडून दादा-दादा अशी विनवणीही केली, मात्र दोघांनीही तिचं ऐकलं नाही. पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत पीडितेच्या घरी धाव घेतली आणि आरोपी पसार होण्याआधीच त्यांना अटक केली. (Madhya Pradesh Rape Land Lord’s son)

संबंधित बातम्या :

मामा-मामीसह तिघा भावंडांची गळा चिरुन हत्या, जमिनीच्या लोभातून कुटुंब संपवलं

नौदल अधिकाऱ्याचा सहकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार, मुंबईतील शेअरिंग फ्लॅटमध्ये अत्याचार

(Madhya Pradesh Crime Gwalior Rape Land Lord’s son Raped Girl with Friend)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI