वहिनी प्लीज जरा तुम्ही…नवऱ्याच्या ज्या मित्रावर विश्वास ठेवला, त्याच्याकडूनच मैत्रीचा खून
तिला आधारतालच्या मून लाइट कॅफेमध्ये बोलावलं. त्याने फोन करुन सांगितलं की, वहिनी प्लीज तुम्ही कॅफेमध्ये या. मला काही बोलायचय.

एक महिला नवऱ्याच्या मित्रावर विश्वास ठेऊन कॅफेमध्ये पोहोचली. तिथे तिच्यासोबत जे घडलं, त्याने अंगावर काटा येईल. नवऱ्याचा मित्र महिलेला कॅफेच्या सिक्रेट केबिनमध्ये घेऊन गेला. तिथे त्याने मित्राच्या पत्नीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. महिला ओरडत राहिली पण कोणी तिच्या मदतीला आलं नाही. अखेरीस त्याने महिलेला धमकी दिली की, या बद्दल कुठे कोणाजवळ बोललीस तर वाईट परिणाम होतील. मी तुला जिवानीशी संपवीन. मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये हे कांड झालय.
पीडितेने आधी भितीपोटी कोणाला काही सांगितलं नाही. मग ती हिम्मत एकवटून पोलीस ठाण्यात गेली. तिथे तिने सर्वकाही पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली. आधारताल पोलीस ठाणे क्षेत्रातील हे प्रकरण आहे.
वहिनी प्लीज तुम्ही कॅफेमध्ये या
पोलिसांनी सांगितलं की, आधारताल येथे राहणाऱ्या महिलेने पतीच्या मित्राविरोधात दुष्कर्माची तक्रार नोंदवली आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार मोहित पटेलन तिला आधारतालच्या मून लाइट कॅफेमध्ये बोलावलं. त्याने फोन करुन सांगितलं की, वहिनी प्लीज तुम्ही कॅफेमध्ये या. मला काही बोलायचय. तिथे मग केबिनमध्ये नेऊन त्याने बलात्कार केला. त्यानंतर मोहितने कुठे काही बोलल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
मला तो केबिनमध्ये घेऊन गेला
महिला म्हणाला की, मी यासाठी मोहितवर विश्वास ठेवला कारण तो माझ्या नवऱ्याचा मित्र आहे. पण मला हे माहित नव्हतं की, तो या इराद्याने मला कॅफेमध्ये बोलवतोय. मी तिथे जाताच मला तो केबिनमध्ये घेऊन गेला. तिथे आधी त्याने माझ्यासोबत छेडछड केली. मी विरोध केल्यानंतर त्याने माझ्यावर बलात्कार केला. त्यानंतर मला धमकी दिली की, मी या बद्दल कुठे कोणाला बोलली, तर मला मारुन टाकणार.
काय प्रश्न निर्माण होतायत?
आधारताल पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला. मुख्य आरोपी मोहितसह कॅफे संचालक अमन राठौर आणि प्रिन्स रजकला अटक केली. पण प्रश्न हा निर्माण होतो की, ही महिला आरोपीच्या बोलण्यावरुन तिथे कशी गेली?. पतीच्या मित्रावर लगेच विश्वास कसा ठेवला? असे अनेक प्रश्न आहेत. पोलीस सध्या आरोपींची चौकशी करत आहेत. चौकशीनंतर सर्व प्रकरणाचा खुलासा होईल.
