बायकोला मुठीत ठेवण्यासाठी तांत्रिकाची ट्रिक, गूढ विद्येसाठी दोन नवरोबा जंगलात गेले, तिथून थेट तुरुंगात; असं काय घडलं?
मध्यप्रदेशातील सिवनी येथे दोन नवऱ्यांनी आपल्या पत्नींवर नियंत्रण मिळविण्यासाठी तांत्रिकांचा आधार घेतला. तांत्रिकांच्या सूचनेनुसार त्यांनी वाघिणीची पंजे आणि दात कापले, तसेच तिचे चामडे काढण्याचा प्रयत्न केला. पण, हे कृत्य उघडकीस आल्याने दोघांना पोलिसांनी अटक केली आणि तुरुंगवास झाला. या प्रकरणी एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना अत्यंत धक्कादायक आणि विचित्र आहे.

प्रत्येक नवऱ्याला आपली बायको आपल्या कंट्रोलमध्ये असावी असं वाटतं. तर प्रत्येक बायकोला आपला नवरा आपल्या ताब्यात असावं असं वाटतं. त्यासाठी दोघांचीही खटपट सुरू होते. खरंतर सामंजस्य आणि गोडीगुलाबीने सर्व गोष्टी नीट होऊ शकतात. पण अनेकांना हा मार्गच नको असतो. खासकरून नवऱ्यांना. आता पाहा ना, मध्यप्रदेशातील दोन नवरोबांनाही आपली बायको आपल्या मुठीत असावं असं वाटत होतं. त्यासाठी त्यांनी तांत्रिकांची मदत घेतली. बायको मुठीत आली नाही, पण या दोन्ही नवरोबांना थेट तुरुंगात जावं लागलं. असं का घडलं?
मध्यप्रदेशातील सिवनीमध्ये बायकांना मुठीत ठेवण्यासाठी दोन नवऱ्यांना तांत्रिकांची मदत घेतली. तांत्रिकाने त्यांना जंगलात जाऊन असं काम काही काम सांगितलं. पण बायको कंट्रोलमध्ये येण्याऐवजी दोघेही तुरुंगात गेले. या दोघांनीही बायकोला वश करण्यासाठी तांत्रिकाच्या सांगण्यावरून वाघिणीचे पंजे कापले होते. तसेच वाघिणीचे दातही काढले आणि त्यांची चामडीही कापली होती.
नैसर्गिक मृत्यू नसल्याने पकडलं
या आरोपींनी त्यांचा गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांना त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी जे सांगितलं ते ऐकून पोलीसही हैराण झाले. सिवनी जिल्ह्यात पेंच टायगर रिझर्व्ह एरियात 26 एप्रिल 2025 रोजी एक वाघिणीचा मृतदेह सापडला. तपासानंतर या वाघिणीचा मृत्यू नैसर्गिकपणे झाला नसून तिचे पंजे कापल्याने झाल्याचं आढळून आलं. वाघिणीचे टोकदार दात काढलेले होते आणि तिची चामडीही काढण्यात आलेली होती. त्यानंतर वनविभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आणि आरोपींना अटक केली.
पाच अटकेत
या प्रकरणात एकाला अटक केल्यानंतर त्यात आणखी पाचजण असल्याचं उघड झालं. राज कुमार, झाम सिंह, छबी लाल, रत्नेश पार्टे आणि मनीष उइके असं या पाच लोकांची नावे आहेत. या सर्वांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना अटक केल्यानंतर अधिक चौकशी केली असता राज आणि झाम या दोन आरोपींनी जी कहाणी सांगितली ती ऐकून पोलीस आणि वन विभागाचे अधिकाऱ्यांना धक्काच बसला.
बायकोला कंट्रोलमध्ये आणायचं होतं
दोन्ही आरोपींनी बायकोला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी हे कृत्य केल्याचं सांगितलं. त्यांना एका तांत्रिकाने वाघाचे पंजे आणि दात आणण्यास सांगितलं होतं. त्यावर तंत्रमंत्र केल्याने ताकद मिळते. त्यामुळे बायको वशमद्ये येऊ शकते. जेव्हा ते वाघिणीचे दात आणि पंजे घेऊन आले तेव्हा तांत्रिकाने वाघिणीचे चामडे (खाल) मागितली. त्यासाठी पुन्हा हे दोघे जंगलात गेले. त्यावेळी त्यांना कुणी तरी पाहिलं आणि पकडल्या गेले. या गुन्ह्यात आणखी तीन लोकं असल्याचंही समोर आलं आहे. पोलिसांनी या पाचही जणांना अटक केलं असून त्यांची रवानगी तुरुंगात केली आहे. पुढील कारवाई सुरू आहे.
