बुलडाण्यात कार आणि लक्झरी बसचा भीषण अपघात, वकिलाचा जागीच मृत्यू, 6 जखमी

बुलडाण्यात कार आणि लक्झरी बसचा भीषण अपघात, वकिलाचा जागीच मृत्यू, 6 जखमी

बुलडाणा जिल्हा न्यायालयात काम करणारे अॅड. बी. के. सानप आणि अॅड. रमेश भागीले यांच्या कारला शनिवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास चिखली देऊळगाव राजा मार्गावरील बेराळा फाट्याजवळ भीषण अपघात झाला

गणेश सोळंकी

| Edited By: अनिश बेंद्रे

May 15, 2022 | 8:01 AM

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात (Buldana) चिखली जवळील बेराळा फाट्याजवळ लक्झरी बस आणि कारचा भीषण अपघात (Luxury Bus and Car Accident) झाला. या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या वकिलाचा (Advocate Death) जागीच मृत्यू झाला, तर दोन्ही वाहनातील मिळून एकूण सहा जण जखमी झाले आहेत. शनिवारी रात्रीच्या सुमारास औरंगाबादहून बुलडाण्याकडे परत येत असताना अनियंत्रित झालेल्या इको स्पोर्ट कारने डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या लक्झरी बसला धडक दिली. त्यामुळे लक्झरी बस सुद्धा बाजूच्या शेतात जाऊन उलटली.

बुलडाणा जिल्हा न्यायालयात काम करणारे अॅड. बी. के. सानप आणि अॅड. रमेश भागीले यांच्या कारला शनिवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास चिखली देऊळगाव राजा मार्गावरील बेराळा फाट्याजवळ भीषण अपघात झाला. यात अॅड. सानप जागीच ठार झाले, तर अॅड भागीले हे गंभीर जखमी झाले आहेत. शिवाय लक्झरी बसमधील चार ते पाच जण जखमी झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

बुलडाणा येथील अॅड बी के सानप आपल्या मुलाच्या अॅडमिशन निमित्त काल औरंगाबादला गेलेले होते. त्यांच्यासोबत अॅड. भागीले सुद्धा होते. औरंगाबादहून रात्री बुलडाण्याकडे परत येत असताना अनियंत्रित झालेल्या सानप यांच्या इको स्पोर्ट कारने दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या लक्झरी बसला धडक दिली. त्यामुळे लक्झरी बस सुद्धा बाजूच्या शेतात जाऊन उलटली. त्यामुळे बस ड्रायव्हरसह अंदाजे 5 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

कारचा चेंदामेंदा

इकडे लक्झरीवर आदळलेली कार चेंदामेंदा झाली. ही लक्झरी बस पुण्याकडे जात होती. या अपघात कार चालवत असलेल्या सानप वकिलांनी सीटवरच प्राण सोडलेले होते. तर बाजूला बसलेले अॅड भागीले कारमध्येच अडकले होते. त्यांना क्रेन लावून आणि सब्बलने दरवाजा तोडून कारमधून बाहेर काढावे लागले. या कामात स्थानिक नागरिकांनी भरपूर मदत केली. अॅड भागीले हे गंभीर जखमी झाले असून त्यांना चिखली येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें