40 वर्षीय माजी नगराध्यक्षा राहत्या घरात मृतावस्थेत, अहमदनगरमध्ये खळबळ

40 वर्षीय माजी नगराध्यक्षा राहत्या घरात मृतावस्थेत, अहमदनगरमध्ये खळबळ
श्यामला मनोज ताडे

श्यामला मनोज ताडे अहमदनगर येथील श्रीगोंदा शहराच्या माजी नगराध्यक्षा होत्या. राहत्या घरामध्ये त्यांचा मृतदेह गळ्याभोवती साडी गुंडाळलेल्या अवस्थेत फॅनला लटकलेला आढळला आहे.

कुणाल जायकर

| Edited By: अनिश बेंद्रे

Dec 21, 2021 | 8:50 AM

अहमदनगर : माजी नगराध्यक्षा राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गळ्याभोवती साडी गुंडाळलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला. मयत 40 वर्षीय महिला अहमदनगरमधील श्रीगोंदा शहरात राहत होती.

गळ्याभोवती साडी गुंडाळलेल्या अवस्थेत

श्यामला मनोज ताडे अहमदनगर येथील श्रीगोंदा शहराच्या माजी नगराध्यक्षा होत्या. राहत्या घरामध्ये त्यांचा मृतदेह गळ्याभोवती साडी गुंडाळलेल्या अवस्थेत फॅनला लटकलेला आढळला आहे.

कोण होत्या श्यामला ताडे?

40 वर्षीय श्यामला ताडे या श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये अडीच वर्ष नगराध्यक्ष पदावर कार्यरत होत्या. अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षित जागेवर त्या निवडून आल्या होत्या.

ही घटना अहमदनगरमधील श्रीगोंदा शहरातील धनश्री अपार्टमेंटमधील त्यांच्या राहत्या घरात घडली आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास चालू आहे. मात्र माजी नगराध्यक्षांच्या अकस्मात मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या :

21 वर्षीय नवविवाहितेवर सामूहिक बलात्कार, शाळेतल्या मित्रासह तिघांकडून अत्याचार

नाशकात 22 वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या, बाभळीच्या झुडपात मृतदेह

उल्हासनगरात कौटुंबिक वादातून एकाची हत्या, मुख्य आरोपी फरार तर दोन महिला आरोपींना अटक

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें