AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चहा बनवताना लेकीचं डोकं उडवलं, छाटलेल्या मुंडक्यासह आई-भावाचा सेल्फी, औरंगाबादेत थरार

ज्या ताईने हातावर राखी बांधली, तिच्याविषयी 17 वर्षांच्या भावाच्या मनात इतका राग भिनला होता, की त्याने बहिणीचे शिर धडावेगळे केले. हत्या केल्यानंतर आरोपी भावाने वैजापूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.

चहा बनवताना लेकीचं डोकं उडवलं, छाटलेल्या मुंडक्यासह आई-भावाचा सेल्फी, औरंगाबादेत थरार
crime News
| Edited By: | Updated on: Dec 06, 2021 | 10:40 AM
Share

औरंगाबाद : पळून जाऊन प्रेमविवाह केल्याने अल्पवयीन भावाने बहिणीचं मुंडकं धडावेगळं केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. हत्येनंतर भाऊ आणि आईने तरुणीच्या छाटलेल्या डोक्यासह सेल्फी काढला, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

काय आहे प्रकरण?

औरंगाबाद जिल्ह्यातील गोळेगावात राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीने पळून जाऊन लव्ह मॅरेज केल्यामुळे भावाने तिची कोयत्याने सपासप वार करुन हत्या केली. ज्या ताईने हातावर राखी बांधली, तिच्याविषयी 17 वर्षांच्या भावाच्या मनात इतका राग भिनला होता, की त्याने बहिणीचे शिर धडावेगळे केले. हत्या केल्यानंतर आरोपी भावाने वैजापूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.

कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीस मिळवल्याचा दावा

लेकीने पळून जाऊन लग्न केल्यानंतर आईने तिच्याशी संबंध तोडले होते. 19 वर्षीय तरुणीने ज्युनिअर कॉलेजपासून मैत्री असलेल्या तरुणाशी विवाह केला होता. हा आंतरजातीय विवाह नव्हता, मात्र पळून जाऊन कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीस मिळवल्याच्या भावनेतून या दोघांनी ही हत्या केल्याची माहिती आहे.

चहा बनवताना शिरच्छेद

ताईला भेटण्याच्या निमित्ताने भाऊ आणि आई रविवारी तिच्या घरी गेले होते. त्यावेळी बहीण चहा बनवत असताना स्वयंपाकखोलीत जाऊन कोयत्याने सपासप वार करत भावाने तिची निर्घृण हत्या केली. बहिणीचं डोकं शरीरापासून वेगळं होईपर्यंत तो वार करत राहिला. कळस म्हणजे त्यानंतर छाटलेल्या मुंडक्यासोबत मायलेकाने सेल्फीही काढला.

मराठी चित्रपटावरुन प्रेरणा

हत्या केल्यानंतर आरोपी भावाने वैजापूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, तर आईला अटक केली आहे. ‘सैराट’ चित्रपटात ज्याप्रमाणे आर्चीची तिचा भाऊ प्रिन्स हत्या करतो, त्यावरुन प्रेरणा घेत भावाने ही हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या :

Bengal Crime: बंगालमध्ये अंधश्रद्धेचा गाठला कळस! वृद्ध महिलेला चेटकीण ठरवून मारहाण

VIDEO | प्रवाशांवरुन खेचाखेची, औरंगाबादमध्ये गाडी भरण्यावरुन चालकांची फ्री-स्टाईल हाणामारी

VIDEO | बाईकस्वाराला वाचवताना ट्रकला अपघात, पादचाऱ्यांकडून कोल्ड्रिंक्सची पळवापळवी

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.