Karuna Sharma | करुणा शर्मा यांना अखेर जामीन मंजूर, तब्बल 16 दिवसांनी तुरुंगाबाहेर

अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर करुणा शर्मा यांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.

Karuna Sharma | करुणा शर्मा यांना अखेर जामीन मंजूर, तब्बल 16 दिवसांनी तुरुंगाबाहेर
करुणा शर्मा

बीड : करुणा शर्मा (Karuna Sharma) यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. करुणा शर्मा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीचा निकाल अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायलयाने दिला. मात्र  चार्जशीट दाखल होईपर्यंत शर्मा यांना परळी आणि अंबाजोगाई तालुक्यात येण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. 25 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर शर्मांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. करुणा शर्मा यांना 5 सप्टेंबरला अटक झाली होती. जवळपास 16 दिवसांनी त्यांची न्यायालयीन कोठडीतून सुटका झाली आहे. शर्मांसह त्यांचे चालक अजय मोरेंनाही जामीन मिळाला आहे.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी त्या बीड जिल्ह्यातील परळीमध्ये आल्या होत्या. त्यावेळी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्यांची रवानगी  बीड कारागृहात न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.

काय आहे प्रकरण?

करुणा शर्मा यांना पाच सप्टेंबरला अटक झाली होती. करुणा शर्मांनी आपण धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती. त्यासाठी त्या परळी येथे आल्यानंतर एका महिलेला जातिवाचक शिवीगाळ करत प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली करुणा शर्मा आणि त्यांचा सहकारी अरुण मोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. परळी पोलिसांनी त्यांना 5 सप्टेंबर रोजी अटक केली होती. तर 6 सप्टेंबर रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

नेमकं काय घडलं?

करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आलं होतं. त्यामुळे शर्मा यांचे चालक अजय मोरेंवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच शर्मा यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

व्हायरल व्हिडीओत काय?

दरम्यान, करुणा शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत पिस्तूल ठेवल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत शर्मा यांची गाडी बाजारात आल्याचं दिसत होतं. गाडीभोवती गर्दी झाल्याने ही गाडी काही थोडा वेळ बाजारात थांबली. त्याच संधीचा फायदा घेत एका व्यक्तीने शर्मा यांच्या कारची डिक्की उघडली. तर पिवळी ओढणी परिधान केलेली महिला कारमध्ये काही तरी ठेवताना दिसत होती. त्यानंतर ही गाडी पुढे निघून गेल्याचं या व्हिडीओत दिसत होतं.

करुणा शर्मांची तक्रार

परळीत आल्यानंतर आपल्या अंगावर जमाव धावून आला होता, अशी तक्रार करुणा शर्मा यांनी परळी शहर पोलिसात दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी 70 ते 80 जणांवर गुन्हे दाखल केले होते.परळी  शहरात प्रवेश केल्यानंतर जमावाने त्यांची गाडी रोखली होती. काही क्षण ही गाडी थांबल्यानंतर त्या परत निघून गेल्या होत्या.

संबंधित बातम्या 

करुणा शर्मांच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर; न्यायालयीन कोठडीतील मुक्काम 18 सप्टेंबरपर्यंत वाढला

करुणा शर्मा यांना दिलासा नाहीच, कोठडीतील मुक्काम आणखी वाढला

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI