मोठी बातमी: करुणा शर्मांच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर; न्यायालयीन कोठडीतील मुक्काम 18 सप्टेंबरपर्यंत वाढला

करुणा शर्मा बीडमध्ये असताना त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आले होते. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. 6 सप्टेंबरला पोलिसांनी करुण शर्मा यांना न्यायालयात हजर केले होते. तेव्हा न्यायालयाने करुणा शर्मा यांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. | Karuna Sharma

मोठी बातमी: करुणा शर्मांच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर; न्यायालयीन कोठडीतील मुक्काम 18 सप्टेंबरपर्यंत वाढला
करुणा शर्मा
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 12:54 PM

बीड: अंबाजोगाई सत्र न्यायालयातील करुणा शर्मा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर पडली आहे. जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. मात्र, करुणा शर्मा यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर मंगळवारी अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांकडून लेखी बाजू मांडली नाही. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी 18 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता करुणा शर्मा यांना आणखी काही काळ न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे.

करुणा शर्मा बीडमध्ये असताना त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आले होते. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. 6 सप्टेंबरला पोलिसांनी करुण शर्मा यांना न्यायालयात हजर केले होते. तेव्हा न्यायालयाने करुणा शर्मा यांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. तसेच त्यांच्या ड्रायव्हरला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे न्यायालय आज करुणा शर्मा यांना जामीन देणार किंवा नाही, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर न्यायालयाने त्यांना जामीन नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे.

करुणा शर्मांच्या वकिलाचा आरोप

या सुनावणीवेळी तपास अधिकारी आणि फिर्यादी गैरहजर होते. त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलावी लागली. त्यामुळे करुणा शर्मा यांच्या वकिलाने पोलीस याप्रकरणात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. आता 18 सप्टेंबरला करुणा शर्मा यांना जामीन मिळणार की नाही, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आलं होतं. त्यामुळे शर्मा यांच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल दुपारी शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आली होती. तसेच शर्मा यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यता आलं.

व्हायरल व्हिडीओत काय?

दरम्यान, करुणा शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत पिस्तूल ठेवल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शर्मा यांची गाडी बाजारात आल्याचं दिसत आहे. गाडीभोवती गर्दी झाल्याने ही गाडी काही थोडावेळ बाजारात थांबली. त्याच संधीचा फायदा घेत एका व्यक्तीने शर्मा यांच्या कारची डिक्की उघडली. तर पिवळी ओढणी परिधान केलेली महिला कारमध्ये काही तरी ठेवताना दिसत आहे. त्यानंतर ही गाडी पुढे निघून गेल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

शर्मांची तक्रार

परळीत आल्यानंतर आपल्या अंगावर जमाव धावून आला होता, अशी तक्रार शर्मा यांनी परळी शहर पोलिसात दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी 70 ते 80 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. शहरात प्रवेश केल्यानंतर जमावाने त्यांची गाडी रोखली होती. काही क्षण ही गाडी थांबल्यानंतर त्या परत निघून गेल्या होत्या.

भीमसैनिकांची घोषणाबाजी

दरम्यान, आंबाजोगाई कोर्टाबाहेर भीमसैनिकांनी शर्मा यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. शर्मा या शहरातून आल्या आहेत. त्या परळीत कुणाला ओळखत नाहीत. कोण कोणत्या जातीचा आहे हे त्यांना माहीत नाही. त्यामुळे त्या कुणाला जातीवाचक शिवीगाळ कशा देतील? दलित समाजाला पुढे करून शर्मा यांच्या विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलं असून हे चुकीचं आहे. दलित समाजाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असून अॅट्रोसिटी कायद्याचाही गैरवापर असल्याचं भीमसैनिकांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

करुणा शर्माच्या गाडीत पिस्तूल ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल, फडणवीस, राणे नेमकं काय म्हणाले?

दहावीच्या अभ्यासात मदतीचा बहाणा, नवी मुंबईत 17 वर्षांच्या चुलत भावाकडून बलात्कार, पीडिता गर्भवती

रेमडेसिव्हीर काळाबाजार प्रकरणी 5 वर्षांचा कारावास, महाराष्ट्रातील कोर्टाचा सुपरफास्ट निकाल

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.