ऊसतोड मजूर पुरवठा अधिकाऱ्याची हत्या, कोल्हापुरात खून, मृतदेह हिरण्यकेशीत फेकला

ऊसतोड मजूर पुरवठा अधिकाऱ्याची हत्या, कोल्हापुरात खून, मृतदेह हिरण्यकेशीत फेकला
कोल्हापुरात अधिकाऱ्याचा मृतदेह नदीत सापडला
Image Credit source: टीव्ही9

ऊस तोडणी मजूर पुरवठा करणारे अधिकारी सुधाकर चाळक यांची हत्या करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्याचं अपहरण करुन कोल्हापुरात खून करण्यात आल्याचा आरोप आहे.

भूषण पाटील

| Edited By: अनिश बेंद्रे

Mar 16, 2022 | 11:15 AM

कोल्हापूर : ऊस तोडणी मजूर पुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्याच्या हत्येने (Murder) एकच खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यातील (Beed Crime) अधिकाऱ्याचं अपहरण करुन कोल्हापुरात खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. विशेष म्हणजे शीर धडावेगळं करत ही अमानुष हत्या करण्यात आली. हत्येनंतर अधिकाऱ्याचा मृतदेह हिरण्यकेशी नदीत फेकून देण्यात आला होता. सुधाकर चाळक असं खून झालेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे. आर्थिक व्यवहारातून हा खून झाल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

ऊस तोडणी मजूर पुरवठा करणारे अधिकारी सुधाकर चाळक यांची हत्या करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्याचं अपहरण करुन कोल्हापुरात खून करण्यात आल्याचा आरोप आहे. हिंसकतेचा कळस म्हणजे चाळक यांचं शीर धडावेगळं करत ही अमानुष हत्या करण्यात आली.

धड शिरावेगळं, मृतदेह नदीत

दरम्यान मारेकऱ्यांनी खून करुन मृतदेह कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील नांगणुर बंधाऱ्यावरून हिरण्यकेशी नदीत फेकून दिला होता. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकान हा मृतदेह बाहेर काढला. या मृतदेहाच शीर सापडलेलं नसून त्याचा शोध अद्यापही सुरुच आहे.

आर्थिक व्यवहारातून हत्येचा संशय

आर्थिक व्यवहारातून हा खून झाल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

जागेच्या वादातून रक्तरंजित थरार, चौघांची निर्घृण हत्या, सहा जण गंभीर

कार अडवून डोळ्यात मिर्चीपूड फेकली, भर रस्त्यात बिल्डरच्या हत्येचा थरार

कौटुंबिक वाद टोकाला, प्राध्यापक नवऱ्याकडून पत्नीची राहत्या घरी निर्घृण हत्या

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें