AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon | गतिमंद चिमुकलीवर अत्याचार, सांकेतिक भाषेद्वारे साक्ष, न्यायमंदिरात अखेर नराधमाचा निकाल लागलाच

पीडित चिमुकली ही मतिमंद असल्याने तिची साक्ष नोंदण्यासाठी गुजराती मूकबधिर विद्यालयाचे विशेष शिक्षक यांच्या मदतीने सांकेतिक भाषाद्वारे, इशारे आणि खाणाखुणाच्या आधारे नोंदवण्यात आली.

Jalgaon | गतिमंद चिमुकलीवर अत्याचार, सांकेतिक भाषेद्वारे साक्ष, न्यायमंदिरात अखेर नराधमाचा निकाल लागलाच
चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला शिक्षाImage Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Mar 31, 2022 | 9:29 AM
Share

जळगाव : आठ वर्षांच्या गतिमंद चिमुकलीवर अत्याचार (Rape) करणाऱ्या नराधमाला अखेर शिक्षा सुनावण्यात आली आहे. नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेप (Life Imprisonment) आणि दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. जळगाव (Jalgaon) जिल्हा न्यायालयाने हा निकाल दिला आहे. जळगाव जिल्ह्यात धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणारी आठ वर्षीय मतिमंद चिमुकली ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. चिमुकली घरी असताना गावातील आरोपी रमेश मंगा कळस्कर याने तिला घरात बोलावले. त्यानंतर तिच्यावर अतिप्रसंग करुन अत्याचार केल्याचा आरोप झाला होता.

काय आहे प्रकरण?

याबाबत धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी पोलीस ठाण्यात रमेश मंगा कळस्कर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा खटला जळगाव आणि सत्र न्यायालयात असताना गुन्ह्यात 9 साक्षीदार तपासण्यात आले. यात पिडीत, पीडितेचे वडील, पंच, तपासी अंमलदार आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.

सांकेतिक भाषेद्वारे पीडितेची साक्ष

या खटल्यात पीडित चिमुकली ही मतिमंद असल्याने तिची साक्ष नोंदण्यासाठी गुजराती मूकबधिर विद्यालयाचे विशेष शिक्षक यांच्या मदतीने सांकेतिक भाषाद्वारे, इशारे आणि खाणाखुणाच्या आधारे नोंदवण्यात आली.

घटनेच्या दिवशी पीडित चिमुकली ही घाबरलेल्या अवस्थेत रडत आरोपीच्या घरातून बाहेर पडताना पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. त्यामुळे अत्याचार करणारा रमेश मंगा कळस्कर याला दोषी ठरवण्यात आले.

न्यायमूर्ती खडसे यांच्या न्यायालयात कामकाज झाले असता आरोपी रमेश कळस्कर याला विविध कलमान्वये नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेप आणि सहा हजार रुपयाचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

संबंधित बातम्या :

लहान मुलीचा विनयभंग, शिक्षकाला बाईने दप्तराने बडवलं, गावकऱ्यांनी तुडवलं

वसईत 10 वर्षीय मुलीचा विनयभंग, स्थानिकांकडून आरोपीची धिंड

दुदैवाने बापाला रस्त्याने चालताना मुलीबद्दल असभ्य शेरेबाजी ऐकावी लागतेय; केरळ हायकोर्टाचे मत

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.