VIDEO | नोटांच्या थैलीशेजारी बॅग धरली, शिताफीने एक लाखाचं बंडल लांबवलं, जालन्यातील बँकेत चोराची हातचलाखी

VIDEO | नोटांच्या थैलीशेजारी बॅग धरली, शिताफीने एक लाखाचं बंडल लांबवलं, जालन्यातील बँकेत चोराची हातचलाखी
जालन्यातील बँकेत चोरी

ग्राहकाने नोटांचे बंडल आपल्या थैलीत ठेवली. तो रोकड काढत असताना हा चोरटा संधीची वाट पाहतच उभा होता. त्यानंतर चोराने मोठ्या शिताफीने ग्राहकाच्या थैलीमधील एक लाख रुपयांचे बंडल चोरले.

दत्ता कानवटे

| Edited By: अनिश बेंद्रे

Dec 28, 2021 | 9:47 AM

जालना : पैसे चोरण्यासाठी चोरटे कशी शक्कल लढवतील, याचा नेम नाही. पैसे कमवण्यासाठी डोकं चालवायचं सोडून ते चोरण्यासाठी लावलं जात असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. जालन्यातील एका बँकेतून रोकड (Cash Withdraw) काढणाऱ्या ग्राहकाच्या नोटा एका चोरट्याने हातचलाखीने लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे आपली फसवणूक झाल्याचं ग्राहकाच्या लक्षात येईपर्यंत बराच उशीर झाला होता. ही चोरी बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

काय आहे प्रकरण?

जालना जिल्ह्यातील युनियन बँकेच्या शाखेत चोरीची घटना उघडकीस आली आहे. प्रताप ठोंबरे आणि त्यांचा मित्र कॅश काऊंटरवर पैसे काढत उभे होते. यावेळी ठोंबरेंनी काही रोकड आपल्या थैलीत ठेवली. ठोंबरे रोकड काढत असताना हा चोरटा संधीची वाट पाहतच उभा होता. चोरट्याने मोठ्या शिताफीने प्रताप ठोंबरे यांच्या थैलीमधील एक लाख रुपयांचे बंडल चोरले.

चोरीची पद्धत काय होती?

प्रताप ठोंबरे यांच्या हातातील थैलीजवळ चोराने स्वतःच्या हातातील थैली धरली. त्यानंतर मोठ्या शिताफीने एक लाख रुपयांचे बंडल त्याने ठोंबरेंच्या थैलीतून काढले आणि स्वतःच्या पिशवीत भरले. त्यानंतर काही केलंच नसल्याचा आव आणत त्याने ‘सुमडीत’ बँकेतून पोबारा केला. आता या चोरट्याचा शोध सदर बाजार पोलीस घेत आहेत.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Nashik | बायकोने फारकत शब्द उच्चारताच नवऱ्याची दुथडी भरलेल्या गंगेत उडी…

महाडमध्ये महिला सरपंचाची हत्या, जंगलात विवस्त्र मृतदेह, बलात्काराच्या प्रयत्नाचा संशय

मद्यधुंद कार चालकाचा हैदोस, सात गाड्यांना उडवून झाडावर धडकला, पादचाऱ्यांनी चोपला

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें