पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीसच आपापसात भिडले, वादाचं रुपांतर मारहाणीत

पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीसच आपापसात भिडले, वादाचं रुपांतर मारहाणीत
आनंद नगर पोलीस ठाणे

सामान्य जनतेच्या मदतीसाठी असणाऱ्या पोलिसांची आपसात मारामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. उस्मानाबाद पोलीस अधीक्षक कार्यालयात दोन पोलिस एकमेकांना भिडले.

संतोष जाधव

| Edited By: अनिश बेंद्रे

May 19, 2022 | 7:26 AM

उस्मानाबाद : दोन पोलिसांमध्येच मारामारी (Police Fighting) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात (Police Superintendent office) दोन पोलिसांमध्ये आधी वाद झाला. त्यानंतर त्याचं पर्यवसन हाणामारीमध्ये झालं. उस्मानाबाद जिल्ह्यात हा प्रकार (Osmanabad Crime News) घडल्याचं समोर आलं आहे. कार्यालयीन अधीक्षक नरसिंग कासेवाड यांनी कार्यालयातील वरिष्ठ श्रेणी लिपिक मच्छिंद्र कृष्णा जाधव यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामान्य जनतेच्या मदतीसाठी असणाऱ्या पोलिसांची आपसात मारामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात दोन पोलिस एकमेकांना भिडले.

काय आहे प्रकरण?

उस्मानाबादमधील पोलीस अधीक्षक कार्यालयात दोन पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये आधी वाद झाला. वाद सुरु असतानाच दोघं हमरीतुमरीवर आले. त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. आणि पाहता पाहता वादाचं रुपांतर हाणामारीत झाल्याचा दावा केला जातो.

नेमकं काय घडलं?

उस्मानाबाद पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यालयीन अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले नरसिंग कासेवाड यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे. कार्यालयातील वरिष्ठ श्रेणी लिपिक मच्छिंद्र कृष्णा जाधव यांनी आपल्याला मारहाण झाल्याचा दावा केला आहे.

वादाचं कारण काय?

स्थानिक गुन्हे शाखा येथे बदली झालेल्या पोलीस अंमलदार यांच्याबाबत निनावी तक्रारी अर्जची प्रत मागितल्याने दोघांमध्ये वाद झाल्याचं बोललं जात आहे.

हे सुद्धा वाचा

या प्रकरणी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर कलम 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक पोलीस तपास सुरु आहे

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें