मनोहर भोसलेच्या दोन साथीदारांचा शोध सुरु, करमाळा पोलिसात बलात्काराचा गुन्हा

सध्या मनोहर भोसले पोलीस कोठडीत असून त्याच्या अन्य दोन साथीदारांचा करमाळा पोलिसांकडून शोध सुरु आहे. बारामती पोलिसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर मनोहर भोसलेला करमाळा पोलीस ताब्यात घेणार आहेत

मनोहर भोसलेच्या दोन साथीदारांचा शोध सुरु, करमाळा पोलिसात बलात्काराचा गुन्हा
मनोहर भोसले

सोलापूर : संत बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगत फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसले याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मनोहर भोसलेच्या दोन साथीदारांचा आता सोलापुरातील करमाळा पोलिसांकडून शोध सुरु आहे. आश्रमात मनोहर भोसले आणि त्याच्या दोन साथीदारांनी बलात्कार केल्या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या मनोहर भोसले पोलीस कोठडीत असून त्याच्या अन्य दोन साथीदारांचा करमाळा पोलिसांकडून शोध सुरु आहे. बारामती पोलिसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर मनोहर भोसलेला करमाळा पोलीस ताब्यात घेणार आहेत. करमाळ्यातल्या उंदरगाव शिवारात असलेल्या आश्रमात 2018 मध्ये बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने तक्रारीत केला आहे. त्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोहर भोसलेविरोधात बारामतीतही गुन्हा

विशेष म्हणजे मनोहर मामा भोसले याच्या विरोधात नुकतंच बारामती पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संत बाळूमामांचा अवतार असल्याचे सांगत फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसले (रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांच्यासह त्यांच्या दोन अन्य साथीदारांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा देत आरोपींनी लोकांची फसवणूक केली.

या प्रकरणी तिघांवर फसवणुकीसह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ-अघोरी प्रथा व जादूटोणा व उच्चाटन कायदा तसेच औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा आणि ओंकार शिंदे यांचाही गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.

मनोहर मामांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल

बारामती तालुक्यातील महेश आटोळे यांनी मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले यांनी अंधश्रद्धेतून फसवणूक झाल्याची तक्रार 31 ऑगस्ट 2021 रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं आहे की, माझ्याकडून त्यांनी जवळपास 40 लाख रुपयाचा रो हाऊस घेतला होता. मात्र माझी कुठलीच कामे मार्गी लागली नाहीत. त्यामुळे मी दिलेला रो हाऊस मनोहर मामा यांना परत मागितला. मात्र रो हाऊस मी तुला देणार नाही, कारण तुझ्या तंत्रविद्या करण्यात माझे लाखो रुपये खर्च झाले आहेत. तू मला ते पैसे परत कर त्यावेळेसच मी रो हाऊस परत करेन, असं मनोहर मामा यांनी सांगितले. यामुळे आटोळे यांनी फसवणूक झाल्याची तक्रार बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

मनोहर मामांनी आरोप फेटाळले

दरम्यान, मनोहर मामा यांनी आटोळे यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. मनोहर मामा यांच्यावर गेल्या काही दिवसांत अनेक प्रकारचे आरोप झाले आहेत. मी कुठेही फरार झालो नाही. तिरुपतीला गेलो होतो. माझ्यावरील आरोप तथ्यहीन आहेत. माझ्याकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न आहे. करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. माझी विनाकारण बदनामी सुरु असल्याचं मनोहर मामा यांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या :

संत बाळूमामाचा वंशज असल्याचं सांगणारे मनोहर भोसले पोलिसांच्या ताब्यात, पुणे पोलिसांची साताऱ्यात कारवाई

मनोहरमामा उर्फ मनोहर भोसलेसह तिघांवर बारामतीत गुन्हा दाखल, संत बाळूमामांचा अवतार असल्याचे सांगत केली फसवणूक

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI