गाणं लावलं तरच बिल भरणार, कल्याणच्या बारमध्ये धुडगूस, पोलिसासह 6 जणांना अटक

रात्री बारमध्ये गाणे सुरु होते. मद्यधुंद अवस्थेत या सहा लोकांनी अजून गाणे सुरू ठेवावा अशी मागणी बार मॅनेजरकडे केली. बार मॅनेजरने स्पष्टपणे सांगितले बार बंद करण्याची वेळ आहे, तुम्ही बिल भरा आणि निघून जा. हे ऐकताच या 6 जणांनी बार मध्ये धिंगाणा सुरू केला.

गाणं लावलं तरच बिल भरणार, कल्याणच्या बारमध्ये धुडगूस, पोलिसासह 6 जणांना अटक
कल्याणमध्ये बारमध्ये धिंगाणा, पोलिसासह सहा जणांवर गुन्हा

कल्याण : रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत ऑर्केस्ट्रा बारमध्ये एका पोलिस कर्मचाऱ्यासह सहा जणांनी गोंधळ घातल्याचा प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला. यावेळी त्यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून बार उशिरापर्यंत सुरु ठेवा, अशी धमकी बार मॅनेजरला दिली. कल्याणच्या ताल बारमध्ये सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. उत्तम घोडे असं या पोलीस कर्मचार्‍याचे नाव असून तो टिटवाळा पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.

काय आहे प्रकरण?

टिटवाळा भागात राहणारा शेखर सरनोबत आपल्या काही मित्रांसोबत कल्याण पश्चिमेतील ताल बारमध्ये पार्टी करण्यासाठी आला होता. शेखरसोबत त्याचे पोलीस मित्र उत्तम घोडे, मंगल सिंग चौहान, रिकीन गज्जर, हरिश्याम सिंह, विक्रांत बेलेकर होते. घोडे हा पोलीस कर्मचारी टिटवाळा पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.

नेमकं काय घडलं?

रात्री बारमध्ये गाणे सुरु होते. मद्यधुंद अवस्थेत या सहा लोकांनी अजून गाणे सुरू ठेवावा अशी मागणी बार मॅनेजरकडे केली. बार मॅनेजरने स्पष्टपणे सांगितले बार बंद करण्याची वेळ आहे, तुम्ही बिल भरा आणि निघून जा. हे ऐकताच या 6 जणांनी बार मध्ये धिंगाणा सुरू केला. जवळपास एक तास हा धिंगाणा सुरू होता.

गाणं न वाजवल्यास बिल न भरण्याची धमकी

गाणे सुरू करणार नाही तर आम्ही बिल भरणार नाही असे धमकावत हरीश्याम सिंग यांनी आपली लायसन्स रिवॉल्वर टेबलावर ठेवत बार मॅनेजरला धमकी देण्यास सुरुवात केली. बिल न भरता सर्व सहाजण बार बाहेर येऊन परत धिंगाणा सुरू केला. त्वरित याची माहिती कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांनी या सर्व आरोपींना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. आज या 6 जणांना कल्याण रेल्वे कोर्टात हजर केले असता 1 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास महात्मा फुले पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी देविदास ढोले हे करीत आहेत. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे

संबंधित बातम्या :

वसईत पोलिसांची दादागिरी; दुकानात शिरुन दुकानदाराला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

यॅक यॅक, ईsss तुमचा आवडता समोसा कसा बनवला जातोय बघा, कल्याणच्या हॉटेलचा Video व्हायरल

डॉ. राजन शिंदेंचं नेमकं काय झालं? एका रक्तांकित खुनाचा चक्रावून टाकणारा घटनाक्रम, घराला आरसा दाखवणारी घटना

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI