‘ते प्रमाणपत्र देतो पण 15 हजार रुपये दे’, लाच घेताना तहसीलदाराला अटक

मेहबुब जमादार

| Edited By: |

Updated on: Aug 12, 2021 | 7:23 AM

कुळ असलेल्या जमिन विक्रीकरीता 32 ग प्रमाणपत्राची तक्रारदाराने मागणी केली असता तहसीलदारांनी 15 हजाराची मागणी केली होती. त्यानुसार लाच स्वीकारताना मुरुडचे तहसीलदार गमन गावीत यांच्यासह कर्मचाऱ्याला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबधंक विभागाने अटक केली.

'ते प्रमाणपत्र देतो पण 15 हजार रुपये दे', लाच घेताना तहसीलदाराला अटक
लाच स्वीकारताना मुरुडचे तहसीलदार गमन गावीत यांच्यासह कर्मचाऱ्याला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबधंक विभागाने अटक केली.
Follow us

रायगड : कुळ असलेल्या जमिन विक्रीकरीता 32 ग प्रमाणपत्राची तक्रारदाराने मागणी केली असता तहसीलदारांनी 15 हजाराची मागणी केली होती. त्यानुसार लाच स्वीकारताना मुरुडचे तहसीलदार गमन गावीत यांच्यासह कर्मचाऱ्याला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबधंक विभागाने अटक केली. (Maharashtra Murud Tahsildar Arrested For taking Bribe in Navi mumbai Police)

‘ते प्रमाणपत्र देतो पण 15 हजार रुपये दे’

जमिन विक्रीसाठी त्यावर असलेले कुळ वहिवाकीचे 32 ग प्रमाणपत्रासाठी मुरुड तहसीलदरांकडे मागणी करण्यात आली होती. त्यानुसार मुरुड तहसीलदार गमन गवित यांनी 15 हजारांची लाच मागितली असता तक्रारदाराने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबधंक विभागाकडे दाद मागितली.

याबाबत तक्रारीची खातरजमा करुन लाचलुचपत प्रतिबधंक विभागाचे पोलीस निरिक्षक शिवराज बेंद्रे याच्यासह पथकाने दि. 11 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता मुरुड तहसीलदार गमन गावीत यांच्यासह कर्मचाऱ्याला पकडले. संध्याकाळी उशीरा पर्यंत याबाबत कारवाई सुरु होती.

उस्मानाबादमध्ये लाच घेताना तरुण अधिकारी अटकेत

अंगणवाड्यांना दिलेल्या गॅस कनेक्शनचे 5 लाख 64 हजार रुपयांचे बिल काढण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना परंडा येथील बालविकास प्रकल्प अधिकारी नारायण दशरथ गायके यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. उस्मानाबादच्या लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली आहे.

बिल काढण्यासाठी चक्क प्रति गॅस कनेक्शन 563 रुपये 50 पैसे प्रमाणे लाचेची मागणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे गायके यांना लाच स्वीकारण्याचा मोह रविवारच्या सुट्टीच्या दिवशी सुद्धा आवरता आला नाही.

गॅस कनेक्शनचं बिल काढण्यासाठी लाचेची मागणी

उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील अंगणवाडीना शासनाच्या योजनेप्रमाणे गॅस कनेक्शन देण्याचे काम एका एजन्सीला देण्यात आले होते.या एजन्सीला अंगणवाडीत प्रति गॅस कनेक्शन 6 हजार 533 रूपये 50 पैसे प्रमाणे 86 गॅस कनेक्शन देण्यात आले होते. या कामाचे 5 लाख 61 हजार 461 रुपये बिल काढण्यासाठी प्रति गॅस कनेक्शन 563 रुपये 50 पैसे असे 86 गॅस कनेक्शनचे 48 हजार 461 रुपये लाचेची मागणी बालविकास प्रकल्प अधिकारी नारायण दशरथ गायके यांनी मागितली होती.

आरोपीला रंगेहात पकडले, गुन्हा नोंद

मात्र त्यावर तडजोड करून 40 हजार रुपये लाच स्वीकारताना गायके यांना रंगेहात पकडण्यात आले. गायके यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर परंडा येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानव्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

(Maharashtra Murud Tahsildar Arrested For taking Bribe in Navi mumbai Police)

हे ही वाचा :

गेल्याच वर्षी शासकिय सेवेत रुजू, 40 हजारांची लाच घेताना तरुण अधिकारी उस्मानाबादमध्ये अटक

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI