AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malegaon नगरसेवकांनी पेटवल्याचा संशय; आतापर्यंत 33 जणांना बेड्या, एका बड्या नेत्याच्या भावाचा शोध सुरू

मालेगाव हिंसाचारातील संशयितामध्ये एका बड्या राजकीय नेत्याचा आतेभाऊही आहे. त्याच्यासह दोन विद्यमान नगरसेवकांचा शोध पोलिसांकडून सुरू असल्याचे समजते.

Malegaon नगरसेवकांनी पेटवल्याचा संशय; आतापर्यंत 33 जणांना बेड्या, एका बड्या नेत्याच्या भावाचा शोध सुरू
crime
| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 12:24 PM
Share

नाशिकः त्रिपुरा येथील कथित घटनेवरून महाराष्ट्रात मालेगाव, अमरावती आणि नांदेडमध्ये असंतोषाचा वणवा पेटला. आता हा वणवा अनेकांनी मुद्दाम जाणून-बुजून आपली पोळी भाजून घेण्यासाठी पेटल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे मालेगावमध्ये याप्रकरणी बहुतांश राजकीय क्षेत्राशी संबंधितांचे अटकसत्र सुरू आहे. त्यातही आजी-माजी नगरसेवकांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनीच हे प्रकरण पेटवल्याचा संशय असून, आतापर्यंत 33 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यातील काही जणांचा शोध सुरू आहे. त्यासाठी सीसीटीव्ही चित्रणाचा उपयोग केला जात आहे. नगरसेवक अयाज हलचलने एक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यात त्रिपुरा येथे मुस्लिम नागरिकांवर अन्याय होत आहे. तिथले दंगे रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असे म्हणत ती क्लिप इतर चौघांच्या मदतीने वेगवेगळ्या ग्रुपवर फॉरवर्ड केली. 8 नोव्हेंबरला हा प्रकार घडला. आझादनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून संबंधित नगरसेवक अयाज हलचलला बेड्या ठोकल्या आहेत.

हे आहेत सूत्रधार

मालेगाव हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी पाच वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत. त्यात आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करणे, दगडफेक करणे, लोकांची माथी भडकावणे, त्यासाठी कट रचणे असा संशयितांचा शोध सुरू केला आहे. त्यात सर्वजण आजी आणि माजी नगरसेवक आहेत. दोन विद्यमान नगरसेवक, दोन माजी नगसेवक आणि एका माजी नगरसेवक पुत्राचा समावेश आहे. विशेष म्हणजे एका बड्या राजकीय नेत्याचा आतेभाऊही संशयितामध्ये आहे. त्याच्यासह दोन विद्यमान नगरसेवकांचा शोध पोलिसांकडून सुरू असल्याचे समजते.

या नगरसेवकांना बेड्या

मालेगाव हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी नगरसेवक अयाज हलचल, माजी नगरसेवक रहेमान शहा,अवामी पार्टीचे अध्यक्ष रिजवान बॅटरीवाला, नासीर मेहबूब शेखऱ, वसीम अख्तर मोहम्मद सली, अल्ताफ अन्वर शाह, मोहम्मद जाहीद अनिस अहमद, मोहम्मद इमरान आतिक अहमद, साबीर गौहर, सर्फराज जाविद शेख आणि इम्रान सलीम शेख यांच्यासह अनेकांना बेड्या ठोकल्या आहेत.

यांचा शोध सुरू

मालेगाव हिंसाचार प्रकरणी अनेक संशयित रडावर असून ते फरार आहेत. त्यात युसूफ इलियास, मुस्तकिम डिग्निटी, इम्रान रिजवी, डॉ. रईस रिजवी, सलीम रिजवी, अकील रिजवी, कारी हारुण रिजवी, जाहिद अनिस कच्छी, अफताफ आलम ऊर्फ अर्जुन्या, तौसिफ शेख मुसा, नाविद रज्जा शेख, इब्राहिम रईस शेख, दानिश, अल्ताफ अंधा, जनैद रज्जाक शेख, शकील नमक, तौफिस अहमद, फरदीन लसूणवाला यांचा पोलिसांनी शोध सुरू केला.

आयोजक मोकाट

मालेगावमध्ये त्रिपुरा येथील कथित हिंसाचाराविरोधात रजा अकॅडमी आणि ऑल इंडिया सुन्नी जमियत उलमाने बंद पुकारला होता. त्यानंतर रॅली काढली होती. त्यानंतर हिंसाचार उसळला. अनेक दुकाने जाळली गेली. लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली नाही. ही कारवाई कधी होणार, असा सवाल विचारला जात आहे.

इतर बातम्याः

Bank Holidays: ‘या’ सहा दिवशी बँकांना सुट्टी; चला, तातडीचे आर्थिक व्यवहार लवकर करा!

नाशिककरांनो आत्ताच सावध व्हा, ध्वनीप्रदूषणात शहर राज्यात टॉप 10 मध्ये, स्तर चक्क 75.2 डेसीबलवर

काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड.
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.