AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विवाहानिमित्त नाचगाणे सुरु होते मंडपात, अचानक जे झाले त्यानंतर एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं

पाली जिल्ह्यातील रानवस येथे कुटुंबीयांच्या घरी लग्नाचा सोहळा सुरू होता. यानिमित्त शुक्रवारी संगीत समारंभ आयोजित करण्यात आला होता. समारंभात सलीम भाई हे ही सहभागी झाले होते.

विवाहानिमित्त नाचगाणे सुरु होते मंडपात, अचानक जे झाले त्यानंतर एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं
राजस्थानमधील पाली जिल्ह्यात नाचताना व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यूImage Credit source: social
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Nov 12, 2022 | 6:32 PM
Share

पाली : लग्न समारंभानिमित्त आयोजित संगीत कार्यक्रमात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेनंतर काही वेळापूर्वी उत्साह आणि आनंद असलेल्या लग्न घरावर शोककळा पसरली. संगीत कार्यक्रमात नाचत असताना अचनाक हृदयविकाराचा झटका आल्याने एका 40 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राजस्थानमधील पाली जिल्ह्यात ही घटना घडली आहे. सलीम भाई राणावास असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

सलीमच्या दुर्दैवी मृत्यूमुळे एकच खळबळ माजली. काही वेळापूर्वी आपल्यासोबत नाचणाऱ्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याचे पाहून समारंभात उपस्थित लोकांनाही धक्का बसला.

लग्नानिमित्त संगीताचा कार्यक्रम सुरु होता

पाली जिल्ह्यातील रानवस येथे कुटुंबीयांच्या घरी लग्नाचा सोहळा सुरू होता. यानिमित्त शुक्रवारी संगीत समारंभ आयोजित करण्यात आला होता. समारंभात सलीम भाई हे ही सहभागी झाले होते.

सलीम भाई नातेवाईकांसोबत डान्स करत होते

संगीत समारंभासाठी स्टेज सजवण्यात आला होता. डान्स सुरु होता. सलीम भाई हे ही इतर नातेवाईकांसोबत स्टेजवर डान्स करत होते. सलीम भाई हे मूळचे गुडा रामसिंह येथील रहिवासी असून पेशाने शिक्षक आहेत.

स्टेजवर अन्य तीन लोकांसोबत सलीम भाई डान्स करत होते. थोडा वेळ नाचल्यानंतर सर्व जण थांबतात आणि स्टेजवरुन जात असतात. यावेळी अचानक सलीम भाई स्टेजवर खाली कोसळतात.

बेशुद्धावस्थेत रुग्णालयात नेले मात्र…

तेथे उपस्थित मंडळी त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतात, मात्र सलीम भाई बेशुद्ध होतात. सर्व जण त्यांना तात्काळ रुग्णालयात घेऊन जातात. रुग्णालयात डॉक्टरांनी सलीम भाईला तपासून मृत घोषित केले. सलीमच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!